थिंक टँक स्पेशल
Trending

जलसंधारण प्रकल्पांचे जनक भाई गणपतराव देशमुख

Spread the love

डोंगर, दऱ्या, माळराने व मैदानी भागातही झाडेच झाडे होती. त्यामुळे पाणी टिकून राहत होते. पाण्याची कमतरता भासत नव्हती. परंतु आज मात्र याच देशाची दुरावस्था आपण उघडपणे पाहतो आहे. आज उजाड व भकासपण सर्वत्र दिसून येते. मानवाचा श्वास गुदमरून चालला आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक भागात जलसंधारणाला महत्त्व दिले पाहिजे, याचा ध्यास आबासाहेबांनी आमदार झाल्यापासूनच घेतला होता.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील काही भागांत प्रचंड पैसा खर्च करून मोठ-मोठी धरणे बांधली आहेत, तर काही भागात मोठ्या वा छोट्या नद्या नाहीत व धरणेही नाहीत. अशा ठिकाणी एक तर पाणी उचलून आणणे किंवा पडलेल्या पावसाचे पाणी जलसंधारणाची कामे करून अडविणे व मुरुविणे गरजेचे आहे. याशिवाय पर्जन्यमान कमी असलेल्या प्रदेशात दुसरा कोणताच पर्याय नाही. याचा सुयोग्य विचार करून आबासाहेबांनी सांगोला तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले.

आपला भारत देश हा विविधतेने समृद्ध असलेला देश आहे. जगाच्या तुलनेत तो नैसर्गिकदृष्ट्या अधिकच संपन्न आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेने येथील हवामानही सर्व जीवास पोषक आहे. भारताच्या एका बाजूला ७००० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आपणास लाभला आहे. उत्तरेस हिमालयासारखा उंच असा पर्वत आहे. इतर ठिकाणी प्रचंड दऱ्याखोऱ्या व जंगलांनी व्यापलेला सुजलाम सुफलाम देश म्हणून भारत ओळखला जातो. आपल्या देशाची भौगोलिक रचना ओबडधोबड तर आहेच, पण सुपीकही आहे. त्याचबरोबर लहान-मोठ्या नद्यांचं जाळ विणलेले आहे. या नद्यांनी हजारों खेडी समृद्ध केली आहेत. पाण्यामुळे मानवाने आपली शेती फुलवली आहे, मातीतून सोनं पिकवले. पूर्वीची हिरवीगार वनसंपदा डोंगरमाथा ते खोल दरी हा हिरवाईन झाकून गेलेला प्रदेश पाहिला की, आईनं नेसलेल्या हिरव्यागार शालूची आठवण यावी, अशी भारताची व महाराष्ट्रातील काही प्रदेशांची स्थिती होती.

डोंगर, दऱ्या, माळराने व मैदानी भागातही झाडेच झाडे होती. त्यामुळे पाणी टिकून राहत होते. पाण्याची कमतरता भासत नव्हती. परंतु आज मात्र याच देशाची दुरावस्था आपण उघडपणे पाहतो आहे. आज उजाड व भकासपण सर्वत्र दिसून येते. मानवाचा श्वास गुदमरून चालला आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक भागात जलसंधारणाला महत्त्व दिले पाहिजे, याचा ध्यास आबासाहेबांनी आमदार झाल्यापासूनच घेतला होता.

मानवी जीवनाचा व सजीवसृष्टीचा पाण्यामुळे विकास व विनाश होतो. पाण्याचे महत्त्व पूर्वीपासून चालत आले आहे. पाणी ही मुळात सामाजिक समस्या आहे, म्हणून ते सांभाळण्याची जबाबदारी सामूहिकपणे असायला हवी. संतांनी पाण्यासंबंधी समग्र व व्यापक विचार जो मांडला आहे. तो आबासाहेबांनी रचनात्मक पद्धतीने कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. पडलेल्या पावसाचे पाणी साठवून उर्वरित काळात वापरणे व जपणे याविषयी संत ज्ञानेश्वर म्हणतात,

याचा विचार करूनच जलव्यवस्थापनाचं महत्त्व व पाण्या समजावून सांगितले आहे.

महाराष्ट्रातील काही भागांत प्रचंड पैसा खर्च करून मोठ-मोठी धरणे बांधली आहेत, तर काही भागात मोठ्या वा छोट्या नद्या नाहीत व धरणेही नाहीत. अशा ठिकाणी एक तर पाणी उचलून आणणे किंवा पडलेल्या पावसाचे पाणी जलसंधारणाची कामे करून अडविणे व मुरुविणे गरजेचे आहे. याशिवाय पर्जन्यमान कमी असलेल्या प्रदेशात दुसरा कोणताच पर्याय नाही. याचा सुयोग्य विचार करून आबासाहेबांनी सांगोला तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले.

माणदेशातील सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी व कमी पाण्याचा भाग म्हणून सुपरिचित आहे. ब्रिटिश कालखंडात बुद्धेहाळ येथील मध्यम पाटबंधारे तलाव, पारे-घेरडी येथील लघुपाटबंधारे तलाव, चिंचोली, हंगिरगे व जवळा या ठिकाणचे लघुपाटबंधारे तलाव असून या तलावांच्या माध्यमातून तालुक्यातील काही प्रमाणात शेती ओलिताखाली आली आहे. परंतु १९८० पर्यंत बहुतांश शेती विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून होती. विहिरींवर अवलंबून असलेल्या शेतीला मदत व्हावी, म्हणून आबासाहेबांनी प्रत्येक गावात पाझर तलाव बांधण्यासाठी पुढाकार घेतला. तालुक्यात ज्या ठिकाणी पाझर तलावाची साइट आहे. त्या ठिकाणचे व आसपासचे शेतकरी यांना बोलावून त्यांना पाझर तलावाचे महत्त्व पटवून देऊन आबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात पाझर तलावांची निर्मिती केली.

१९७२ पासून पाझर तलाव बांधकामास सुरुवात झाली. परंतु १९८० ते १९९० च्या दशकात सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाझर तलाव निर्माण झाले आहेत. अकोला ६, आलेगाव ८, मेडशिंगी ६, घेरडी १४, सोनंद ४, जवळा ८, हंगिरगे ६, डिकसळ १, वासूद ३, सावे ४, वाणीचिंचाळे ४. वाकी- घेरडी ३, पारे ७, नराळे ७, कडलास ५, निजामपूर १, मांजरी २, चिंचोली ३. बाढेगाव १, राजापूर १, बुरलेवाडी २, कोळे १ तिप्पेहळ्ळी १, चोपडी १, सोनलवाडी १, हणमंतगाव २, डोंगरगाव २, लोटेवाडी १, शिवणे १, पाचेगाव (बु) १, अजनाळे याबरोबर अनेक वाड्यावस्त्यांवर पाझर तलावांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी अडवून मुरविल्याने शेतकऱ्यांच्या विहिरींना फायदा झाला आहे. त्यामुळे शेती उत्पादन वाढीस मदत झाली आहे. त्याचबरोबर माण, बेलवण, कोरडा व अप्रुपा नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून विशेष निधीची तरतूद करून मंजूर केले.

रोजगार हमी योजनेतून जमीन सपाटीकरण, नालाबंडिंग व सी.सी.टी. चाऱ्यांमुळे जलसंधारणाच्या कामाला अधिकच बळकटी मिळाली आहे. हे जलसंधारणाचे काम अन्य तालुक्याच्या मानाने सांगोला तालुक्यात लक्षणीय स्वरूपाचे झाले आहे.

माण नदीवर माण नदी ज्या खवासपूर गावात प्रवेश करते तेथून माण नदीच्या सांगोला हद्दीतील मेथवडे गावापर्यंत एकूण १६ कोरडा नदीवर, गळवेवाडीपासर वाढेगावपर्यंत १२ अनुपा नदीवर ०२, बेलवण नदीवर ०३, मांजरी ०१ व वाकी (शिवणे)

०१ असे एकूण ३५ बंधारे बांधण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यामध्ये आबासाहेबांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेष म्हणजे हे जे बंधारे बांधले आहेत, त्यांचे एका बंधाऱ्याचे पाणी दुसऱ्या बंधाऱ्यापर्यंत थांबावे, अशा पद्धतीची रचना केली असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. कोरडा नदीवर गळवेवाडीपासून वाढेगाव येथील माण नदीच्या संगमापर्यंत एकाला एक लागून बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांच्या माध्यमातूनही पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. याचे सारे श्रेय आपोआपच आबासाहेबांना जाते, तर अनुपा नदीवर व तालुक्यातील अनेक गावातील ओढ्यांवर काही ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यांसाठी कॅचमेन्ट एरिया आहे, तेथेही सिमेंट बंधारे बांधल्याने त्याचाही फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना झाला आहे.

रोजगार हमी योजनेतून जमीन सपाटीकरण, नालाबंडिंग व सी.सी.टी. चाऱ्यांमुळे जलसंधारणाच्या कामाला अधिकच बळकटी मिळाली आहे. हे जलसंधारणाचे काम अन्य तालुक्याच्या मानाने सांगोला तालुक्यात लक्षणीय स्वरूपाचे झाले आहे. त्यांनी सांगोला तालुक्यातील जलसिंचनाच्या केलेल्या प्रयत्नांची व्याप्ती स्पष्ट करताना म्हणता येईल की, इतर तालुक्याच्या तुलनेने खूपच अधिक नजरेत भरणारी आहे. या जलसंधारणाच्या कामांतून लोकांना रोजगार हमी योजनेतून रोजगार तर उपलब्ध करून दिला आहेच! तसेच जमिनीला व पिकांनाही या जलसंधारणाच्या कामांमधून पाण्याचा आधार मिळाला त आहे. आबासाहेबांचा भविष्यकालीन दूर दृष्टिकोन व पाठपुरावा करण्याची चिकाटी त हेच आहे.

आबासाहेबांनी पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व जाणून घेतले. पाण्याविषयी पूर्वसूरींनी केलेला जलअभ्यास समजून घेतला, त्यावर चिंतन केले. प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी असल्याने हा पाण्याचा विचार त्यांनी विविध कामांद्वारे प्रत्यक्षात सांगोला तालुक्यात ४१ मिनीतली पाणी पातळी वाढली आहे. या वाढीचा पाया गणपतआबांचे जलविषयक गावोगावी कृतीतून दूगोच्चर केला. त्यामुळे आज बागायती क्षेत्रात वाढ झाली असून बेदार व कार्य आहे.

(डॉ. किसन माने लिखित “राजकीय मानदंड माई गणपतराव देशमुख” या ग्रंथातून साभार)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका