
सांगोला : विशेष प्रतिनिधी
आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासह सांगोला शहरात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे प्रशस्त आणि देखणे ईदगाह मैदान होय.
सांगोला शहरातील मुस्लीम समाजाची प्रार्थनास्थळाची किमान ५० वर्ष जुनी मागणी आमदार शहाजीबापूंनी पूर्ण केली आहे. यासाठी त्यांनी मुस्लिम समाजातील ज्येष्ठांशी चर्चा केली. नगरपालिकेकडील ५२ गुंठे जागा निश्चित केली. हे काम करत असताना ते भव्यदिव्य व्हावं असं स्वप्न बापूंनी पाहिले, अनेक रचनाकारांशी चर्चा केली आणि त्यावर काम सुरु करण्यासाठी आमदार फंडातून पहिला २५ लाखांचा निधी दिला, प्रत्यक्ष बांधकामास सुरवात झाल्यानंतर बापूंनी वेगवेगळ्या निधींमधून एकूण ४.५० कोटींचा खर्च करून ईदगाह मैदान पूर्णत्वास नेलं आहे.
नगरपालिकेकडील ५२ गुंठे जागा निश्चित केली. हे काम करत असताना ते भव्यदिव्य व्हावं असं स्वप्न बापूंनी पाहिले,
राज्यातील इतके प्रशस्त व देखणे ईदगाह मैदान हे सांगोला शहराचे वैभव ठरेल.
महाराष्ट्राची माती, संस्कृती, परंपरा, सात्विकता, सहिष्णूता यांचा अभिमान आहे, सर्वधर्मसमभावाची भाषा आचरणात देखील तितक्याच प्रभावीपणे आणायला हवी या भावनेतून मुस्लिम समाजाची ईदगाह मैदानाची खूप जुनी मागणी माझ्या कारकिर्दीत पूर्ण झाली, याचा मला अभिमान आहे, अशी भावना आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली.