
सांगोला / डॉ.नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात अलीकडील काळात विचारांचे आणि सुसंस्कृत राजकारण राहिले नाही. त्यात बदल करायची जबाबदारी युवकांनीच घ्यावी लागेल. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी नियोजनबद्ध पावले टाकावी लागतील. सांगोला तालुक्यात सुवर्णकाळ आणायचाय. झालेल्या चुका दुरुस्त करण्याची मोठी संधी तालुकावासियांना मिळाली आहे, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मांडली. ते “थिंक टँक न्यूज नेटवर्क”शी बोलत होते.
डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, “माझ्या सांगोला तालुक्यासाठी मला सुवर्णकाळ आणायचा आहे. याच क्षणी आबासाहेबांची आठवण येते. शेतीतून समृद्धी आली की पाठोपाठ अन्य विकासकामे होतात. स्व.आबांचा विचार घेऊन मी पुढे निघालो आहे. जोडीला बंधू डॉ.अनिकेतही आहे. आम्हा दोघांचे एकच व्हिजन असून, आरोग्य, उत्तम शिक्षण अन् पाणी याचसाठी आमचा लढा राहणार आहे.
आबासाहेबांची आठवण येते
आबासाहेब आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचा विचार, त्यांचे बळ, त्यांनी घडविलेली माणसं माझ्या कुटुंबीयांसमवेत उभी आहेत. या माणसांकडे पहिलं की मलाही गहिवरून येते. ही माणसं आबांची ताकद होती. ती आज माझ्या पाठीशी ताकद बनून उभी राहिली आहेत. मी फक्त निमित्त आहे. सगळं आहे ते आबासाहेबांच आहे. त्यांनी हाती घेतलेली काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आहे. ती जबाबदारी मी तुमच्या मदतीने, अथक प्रयत्नाने पार पडणार आहे. तुमचाही आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर आहे. त्यामुळे माझ्या अंगी दहा हत्तींच बळ येतं. सामान्य माणसासाठी लढताना वाटेत असंख्य अडथळे आहेत. विचारांची लढाई आहे. ती आबांच्या विचारानं मला लढायची आहे.
आजही आबासाहेबांच्या कार्याची पावला पावलाला आठवण येथे. त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती. ते लोकांचे सगळे म्हणणे ऐकून घ्यायचे. न्याय मार्गाने त्यांचे काम करायचे. एखादे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांची समजूत काढायचे. एखादे योग्य काम अडवल जात असेल, तर व्यवस्थेला जाब विचारून ते करून घेणं ही त्यांची पद्धत होती.
राजकारण बदमाशांचा अड्डा
राजकारणाकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलला आहे. राजकारणाची पातळी रसातळाला गेली आहे. मनी आणि मसल पॉवर यामुळे युवक राजकारणात येण्यास तयार नाही. विचारांचे आणि सुसंस्कृत राजकारण राहिले नाही. त्यात बदल करण्याची जबाबदारी युवकांनाच घ्यावी लागेल. पूर्वीच्या जुन्या जाणत्या लोकांची राजकारणाची पद्धत, द्वेष विरहित राजकारण, तालुक्याला शोभेल अशा राजकारणासाठी युवकांनी पुढे यायला पाहिजे.
..तर राजकारण हा बदमाशांचा अड्डा बनेल!
आबासाहेब म्हणायचे, सुसंस्कृत लोक राजकारणात न आल्यास राजकारण हा बदमाशांचा अड्डा बनेल. राज्यासाठी चांगले धोरण ठरवायचे अधिकार चांगल्या विचारांच्या लोकांच्या हाती राहिले पाहिजेत. यासाठी युवकांनी राजकारणात आले पाहिजे. समाजासमाजात एकोपा टिकावा, शांतता नांदावी, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. चांगल्या वाईटाची जाणं आपल्या सगळ्यांना आहे. उमेदवार निवडताना या सगळ्यांचा विचार झालेला आहे.
स्व.आबांनी देशात तालुक्याचे नाव केले तेच आपणच अजरामर ठेवायचे आहे. आबांनी ५५ वर्षात केलेल्या कामाचा वारसा पुढे घेवून मला लोकसेवा करायची आहे.
आबासाहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी!
डॉ. बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की, आजही आबासाहेबांच्या कार्याची पावला पावलाला आठवण येथे. त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती. ते लोकांचे सगळे म्हणणे ऐकून घ्यायचे. न्याय मार्गाने त्यांचे काम करायचे. एखादे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांची समजूत काढायचे. एखादे योग्य काम अडवल जात असेल, तर व्यवस्थेला जाब विचारून ते करून घेणं ही त्यांची पद्धत होती.
काय व्हिजन घेऊन लढणार?
सांगोला तालुक्याच्या व्हिजनबाबत बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, आबासाहेबांनी सांगोला तालुक्यात सुजलाम सुफलाम मतदारसंघाचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी राजकारण सुरू केले. त्यावेळी त्यांच्यासमोर मतदार संघातील दुष्काळ हे मोठे आव्हान होते. त्यांनी सिंचन योजनांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे तर तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. हे सारे श्रेय आबांचे आहे. याच बरोबर उत्तम शिक्षण, चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा व पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेणे हेच माझेही व्हिजन राहणार आहे. गेली पाच वर्ष तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर मी हे काम करीत आहे.तुम्हा सर्वांच्या मदतीने हे यश नक्कीच मिळेल.
ही विचारांची लढाई आहे!
सामान्य माणसांसाठी लढताना वाटेत असंख्य अडथळे आहेत. विचारांची लढाई आहे. ती आबासाहेबांच्या विचारानं मला लढाईची आहे. तरुणांच्या हाताला काम मिळविण्यासाठी नियोजनबद्ध पावले टाकत आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद ही सोबत आहेत. त्यामुळे ही लढाई जिंकणे ही महत्त्वाचे आहे.
स्व.आबांनी देशात तालुक्याचे नाव केले तेच आपणच अजरामर ठेवायचे आहे. आबांनी ५५ वर्षात केलेल्या कामाचा वारसा पुढे घेवून मला लोकसेवा करायची आहे.