डिकसळमध्ये लिंगायत समाजाचे वर्चस्व
सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद कोरे, व्हाईस चेअरमनपदी सतीश उजनीकर

डिकसळमध्ये लिंगायत समाजाचे वर्चस्व
सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद कोरे, व्हाईस चेअरमनपदी सतीश उजनीकर
सांगोला / नाना हालंगडे
गावात लिंगायत वाणी समाजाची ऐनमेन चारच घर पण या चार घराना न्यात देणारे सर्व समावेशक राजकारण डिकसळ डिकसळ गावात पहावयास मिळाले. विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद लक्ष्मण कोरे तर व्हाईस चेअरमनपदी सतीश महादेव उजनीकर या दोघांच्या बिनविरोध निवडी करीत गावकऱ्यांनी गावात अल्पसंख्यांक असलेल्या समाजालाही सेवा करण्याची संधी दिली.
त्याच झालं असं चार वर्षापूर्वी येथील सोसायटीची बिनविरोध सोसायटी झाली होती.यामध्ये आम्.डॉ.बाबसाहेब देशमुख व माजी आम्.दीपक साळुंखे_पाटील गटाच्या सदस्यांनी जागा घेत ही सोसायटी बिनविरुद्ध केली होती.प्रारंभी शेकापकडे तर नंतर आबा गटाकडे चेअरमन पद अशा गोष्टी ठरल्या होत्या.त्याप्रमाणे पाहिली दोघांनी राजीनामे दिल्याने या रिक्त पदी अरविंद कोरे व सतीश उजनीकर या दोघांच्या निवडी झाल्या.
डिकसळ विकास सोसायटी ही अकरा सदस्यांची अजून,यांचे रेशन दुकान हेच एकमेव उत्पन्नाचे साधन आहे.हेच दुकान पूर्वी आबा गटाकडे तर आता शेकापकडे चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.हाच निर्णय प्रारंभी निवडणुकी नंतर ठरविला होता.याच शब्दाला जाणत गावातील सर्वपक्षिय नेत्यांनी हे सारे खरे करून दाखविले.त्याच अनुषंगाने आजच्या ह्या निवडी पार पडल्या.यावेळी सरपंच सोसायटी सदस्य व गावातील अन्य मान्यवरांनी याचा सत्कार केला.
गावाने अल्पसंख्याकाना न्याय दिला
गावातील सर्वपक्षिय नेत्यांनी आम्हा लिंगायत वाणी समाजाला न्याय दिला.माझ्याकडे चेअरमन पदाची जबाबदारी सोपविली,ही अभिमानाची गोष्ट आहे.याच सोसायटीच्या माध्यमातून गावाला न्याय देवू.रेशन दुकानातील चांगल्या प्रकारची सेवा देवू.तर सोसायटीचे सभासद असलेल्या सर्वांना सोसायटी मोठ्या प्रमाणात मिळवू देवू. – अरविंद कोरे,नूतन चेअरमन