सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे आज गुरुवारी तालुक्यातील 11 गावांचा प्रचार दौरा करणार आहे. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आले आहे.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे आज सकाळी नऊ वाजता बामनी, सकाळी 10 वाजता मांजरी व देवकतेवाडी, सकाळी अकरा वाजता देवळे, दुपारी बारा वाजता सावे, दुपारी एक वाजता मेथवडे, दुपारी चार वाजता चिंचोली, सायंकाळी पाच वाजता गायगव्हाण, सायंकाळी सहा वाजता खिलारवाडी, सायंकाळी सात वाजता महीम आणि कारंडेवाडी या गावांमध्ये प्रचार दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि मित्र पक्षांचे नेते कार्यकर्ते वक्ते सहभागी होणार आहेत.