
सांगोला : तालुका प्रतिनिधी
दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजनाळे येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शेकाप नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली.
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील शेकाप मधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.
अजनाळे येथील राकेश बनसोडे, सोमनाथ धांडोरे, अतुल धांडोरे, बापू धांडोरे, डॉ.धांडोरे, रोहित बनसोडे, प्रितम धांडोरे, युवराज ढोबळे, संदीप धांडोरे, धना गाडे, बंडू धांडोरे, अमर धांडोरे, साहिल चंदनशिवे, उमेश धांडोरे, अनिल वाघमारे, विनायक धांडोरे, विशाल गेजगे, अजय धांडोरे, नंदू बनसोडे, विजय भडंगे यांनी शेकापला रामराम करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत दिपकआबा साळुंखे पाटील यांना अजनाळे गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी विजयदादा येलपले आणि मान्यवर उपस्थित होते.
राजुरीतील कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील राजुरी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

आपल्यावर व आपल्या पक्षावर जो विश्वास या कार्यकर्त्यांनी दाखविला, त्याबद्दल विशेष ऋण व्यक्त करीत तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी प्रवेशकर्ते व ग्रामस्थांना दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत.
दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक असल्याने दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.
सांगोला तालुक्यातील राजुरी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दिपकआबांनी या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढील काळातही ते विकासकामांना प्राधान्य देतील, त्यासाठी आम्ही त्यांना विधानसभा निवडणूक सहकार्य करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी राजुरी ता.सांगोला येथील संतोष बंडगर, संतोष दबडे, अंकुश दबडे, धनाजी निळे, सतीश पाटील, सुनील बंडगर, प्रकाश व्हळगळ, समाधान दबडे, अनिल दबडे, पंकज दबडे, दीपक बंडगर या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली.
यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, जनतेने माझी उमेदवारी घोषित केली असल्याने मी जनतेचा उमेदवार म्हणून तुमच्यापुढे आलो आहे. माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही दिपकआबांनी ग्रामस्थांना दिला.