डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या प्रचारार्थ इंदोर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर मैदानात

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
सांगोला विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ इंदोर होळकर घराण्याचे वंशज राजे भूषणसिंह होळकर मैदानात उतरले आहेत. कोळा येथे आयोजित विराट सभेत त्यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून देण्याचे आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. कोळा गावात डॉ. देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेला हजारोंची गर्दी जमली होती. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, शेकाप नेते डॉ. अनिकेत देशमुख, ऍड. शंकर सरगर, बापूसाहेब ठोकळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रताप देशमुख, शेकापचे चिटणीस दादाशेठ बाबर आदी उपस्थित होते.
इंदोरचे घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ते वंशज आहेत.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघातील विविध गावांमध्ये त्यांच्या जंगी सभा झाल्या आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शीतलताई मोहिते पाटील यांनी या सभांमध्ये उपस्थिती लावून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
आज शनिवारी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ इंदोर होळकर घराण्याचे वंशज राजे भूषणसिंह होळकर मैदानात उतरले आहेत. कोळा येथे आयोजित विराट सभेत त्यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून देण्याचे आवाहन केले.
सभेपूर्वी कोळा गावातून डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांची भव्य रॅली काढण्यात आली.