बहुजन नेते बापूसाहेब ठोकळेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळांमध्ये तसेच विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बापूसाहेब ठोकळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प केला होता. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
विविध ठिकाणी झालेल्या या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, ज्येठ नेते बाबासाहेब बनसोडे, दीपक बनसोडे, चंचल बनसोडे, आबासाहेब शेजाळ गुरुजी, हमीद बागवान, बबलू रायटर, दुर्गाप्पा चव्हाण, सागर पवार, नंदकुमार चंदनशिवे, अरविंद केदार, दीपक एवळे, विनोद रणदिवे, माजी नगरसेविका विजयाताई बनसोडे, शिक्षिका वैशाली शेळके, इंगोले मॅडम, प्राचार्य पवार सर, शंभू माने, सरपंच देवकते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सावे माध्यमिक विद्यालय, कै. वामनराव शिंदे आदर्श विद्यालय येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याशिवाय मसणजोगी समाजातील विद्यार्थ्यांना स्मशानभूमी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मरीआई गाडेवाले समाजातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सांगोला शहर तसेच परिसरातील विविध ठिकाणी पाचशेहून अधिक विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही हार, बुके यावर खर्च न करता शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या या साहित्याचे विविध ठिकाणी वाटप करण्यात आले.
समाजातील अनेक विद्यार्थी आजही हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अशी मदत करता आली याचे समाधान आहे. आगामी काळातही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा संकल्प केला आहे, असे मत बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केले.