बाबासाहेबांनी चारच दिवसात वातावरण फिरवलं
शेकापकडून “टप्प्यात” नव्हे “शांततेत” कार्यक्रम
सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रचार हळूहळू शिगेला पोचला आहे. सर्वच पक्षांकडून सभांचा धडाका लावण्यात आला आहे. मागील पंधरा दिवसात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी शेकापला खिंडार पाडल्याचा दावा केला होता. मात्र, महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स आणि शेकापचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात जावून, प्रत्येक सभेत या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. अगदी चारच दिवसात त्यांनी वातावरण फिरवलं आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या पर्दाफाशमुळे विरोधी उमेदवार मात्र चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
सुरुंग, खिंडार, भूकंप अशा बातम्या पेरून विरोधी गटातील नेत्यानी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता.
महाराष्ट्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची खाती होती असे भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अगदी शांतपणे रणनीती आखत विरोधकांना चांगलाच घाम फोडला होता. मागील चार दिवसात त्यांनी सभांच्या माध्यमातून सबंध मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या सभांना हजारोंची गर्दी जमत आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे ज्या ज्या गावांमध्ये सभा घेत आहेत तेथे ते कार्यकर्त्यांना जाहीरपणे विचारत आहेत की, “तुमच्या गावात शेकापमधील कार्यकर्ते फुटून गेले का? तुमच्या गावात शेकापला खिंडार पडले का?” कार्यकर्ते मात्र “एकही कार्यकर्ता शेकापमधून फुटून इतर पक्षात गेला नसल्याचे विश्वासाने आणि ठामपणे सांगत आहेत. काही गावात तर अजबच प्रकार घडला आहे. काही विरोधी नेत्यांनी फोटो काढण्याचा बहाणा करून नवाख्या तरुणांच्या गळ्यात त्या पक्षाचा गमजा घालून त्या कार्यकर्त्याने आमच्याच पक्षात प्रवेश केला असे भासवण्याचे किळसवाणे कृत्य केल्याचाही प्रकार घडला आहे.
सभांचा धडाका; विरोधकांच्या उरात धडकी
डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख या दोघा भावांनी मागील आठवड्याभरापासून या मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. ज्या ज्या गावात ते जातील तेथे शेकाप तसेच मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात वाजत गाजत स्वागत केले जात आहे. भर उन्हातही शेकडोंची गर्दी या कॉर्नर बैठकांना उसळत असल्याचे दिसून येत आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबत काम केलेले ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण, महिला, बालके मोठ्या उत्साहाने सभेला येत आहेत. भाई गणपतराव देशमुख यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या निधनानंतर हा पक्ष पोरका झाला होता. मात्र डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने नवे आबासाहेब आम्हाला मिळाल्याची त्यांची भावना आहे.
बाबासाहेबांनी वातावरण फिरवलं
भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे प्रथमच निवडणूक लढवत आहेत. राजकीय निवडणुकीचा कोणताही अनुभव नसताना ते अतिशय शांतपणे रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहेत.
“टप्प्यात” नव्हे “शांततेत” कार्यक्रम
सुरुंग, खिंडार, भूकंप अशा बातम्या पेरून विरोधी गटातील नेत्यानी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. “बाबासाहेब देशमुख यांनी सहा महिन्यांपूर्वी मतदार यादीत नाव नोंदविले”, “पेनुरचे पार्सल माघारी पाठवा” “लाल फडकं नष्ट करा” अशी खालच्या पातळीवरील टीका विरोधकांकडून बाबासाहेब देशमुख यांच्यावर करण्यात आली होती. मात्र बाबासाहेब देशमुख यांनी ही सर्व टीका अतिशय संयमाने घेत जनतेमध्ये थेट जाऊन त्याला प्रत्युत्तर दिले आहे. निकालापूर्वीच बाबासाहेबांनी “टप्प्यात” नव्हे तर”शांततेत” कार्यक्रम केला असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.