सांगोला / डॉ. नाना हालंगडे
आमच्या कुटुंबियातील कोणताही राजकीय वारसा नव्हता. स्व.आबासाहेबांनी राज्याच्या राजकारणात ठसा उमटविला. दुर्दैवाने काही राजकीय घडामोडी घडल्या. आबासाहेबांचे महान कार्य बघत आपणही लोक सेवेत आयुष्य समपिर्त करावे या उद्देशाने राजकारणात आलो. सांगोला तालुक्यासाठी स्व.आबासाहेबांनी केलेल्या थोर कार्याला संधी नव्हे तर जबाबदारी म्हणून मी हे पार पडणार आहे. राजकारणाला सत्तेचे किंवा गुंडगिरीचे साधन नव्हे तर सेवेचे माध्यम समजून काम सुरू केले आणि त्याच दृष्टिकोनातून ते सुरू ठेवू, अशा शब्दात डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भूमिका मांडली. ते पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, राज्यातील राजकारणात स्वतःच्या महान कार्याने लैकिक प्राप्त केलेल्या मोजक्या नेत्यात स्व.आबासाहेबांचे आजही नाव आहे. त्यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जात आहे.
ही निवडणूक सोपी नाही अन् अवघड ही वाटत नाही. आम्ही संपूर्ण ताकद लावू आणि कष्ट करण्याची आमची तयारी आहे. आम्ही आमचे काम करीत होतो. आताही करतोय आणि यापुढेही करतच राहणार.
सांगोलेकरांना वेळ देणारा व पाय जमिनीवर ठेवून काम करणारा, त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या सोबत असलेला व प्रश्न समजून घेवून सोडविणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. यासाठीच मी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत देशमुख म्हणाले की, ही निवडणूक सोपी नाही अन् अवघड ही वाटत नाही. आम्ही संपूर्ण ताकद लावू आणि कष्ट करण्याची आमची तयारी आहे. आम्ही आमचे काम करीत होतो. आताही करतोय आणि यापुढेही करतच राहणार.
महाविकास आघाडीचे नेते मदत करतील
सांगोला तालुक्यात शिवसेना उबाठा गटाने दिलेला उमेदवार हा शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी दिला आहे. उलट त्या दोघांमधील मतविभागणीचा शेतकरी कामगार पक्षाला फायदा होईल. महाविकास आघाडीचे नेते मदत करतील, असा विश्वास आहे.