
सांगोला : विशेष प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विशेषतः दुष्काळी भागातील युवकांनी शेती व्यवसायाबरोबरच शेतीला पूरक व्यवसाय व छोट्या छोट्या स्तरावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी व्यक्त केले काल दिनांक २१ डिसेंबर रोजी सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील अल्पभूधारक युवक शेतकऱ्यांची बैठक अस्तित्व संस्थेच्या वासुद रोड येथील कार्यालयात आयोजित केली होती या बैठकीत युवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढें बोलतांना त्यांनी सांगितले की,
आज दिवसेंदिवस बेरोजगारी उग्र स्वरूप धारण करीत आहे. गावोगावी सुशिक्षित-अशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढते आहे. त्या तुलनेत नोकऱ्या कमी होत आहेत अशा परिस्थितीत सर्वाँना नोकऱ्या मिळणे अशक्यप्राय होत आहे यावर पर्याय म्हणून युवकांनी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळले पाहिजे.आधुनिक शेती करित असताना रासायनिक खतांचा,औषधांचा वापर कमी केला पाहीजे.
ग्रामीण भागांत आज काही प्रमाणात दळणवळणाच्या सोयी होत आहेत्. ग्रामीण भागात अनेक उद्योग सुरू करता येऊ शकतात त्यासाठी इच्छाशक्ती व आवड असली पाहिजे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. ग्रामीण भागांत अनेक उद्योग व्यवसाय करता येवू शकतात ते उद्योग युवकांनी सूरू करावेत असे शहाजी गडहिरे यांनी सांगितले.
अस्तित्व संस्थेच्या वतीने गेल्या २-३ वर्षामध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी मदत केली असुन “कोरडवाहू फळबाग लागवड” कार्यक्रम राबवला आहे. दुष्काळी भागात मोठया प्रमाणात आंबा लागवड करुण अँग्रो फॉरेस्ट्री तयार केली आहे. त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला अस्तित्व संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अटलास कॉपको इंडीया लिमिटेडच्या सहकार्याने तालुक्यातील १५८ युवा शेतकऱ्यांनी आंबा लागवड केली आहे. ही लागवड व संगोपन केमिकल विरहित केली असुन येत्या सिझन मध्ये आंबा उत्पादन सूरू होईल असे अनेक युवकांनी सांगितले.
सुरुवातीला उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत सागर लवटे यांनी केले व प्रास्ताविक प्रविण सूर्यगंध यांनी केलं. बैठकीस वाणीचींचाळे गावचे जितेंद्र गडहिरे यांचेसह विविध गावचे युवक शेतकरी उपस्थित होते. बैठकीत मारुती गरंडे, बापू निळे, रामा मोरे, सिद्धेश्वर गडहिरे, वसंत केंगार, सत्यवान बंडगर, मारुती खांडेकर यांनी आपली मनोगते व्यक्त करून आलेले अनुभव व्यक्त केले.
बैठकीस ६० शेतकरी युवक सहभागी होते. शेवटी आभार सुप्रिया जाधव यांनी मानले.