सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील कोळा येथील शोभा सुखदेव कोळेकर (वय ४५) मालकी शेतात काम करत असताना,कोळे फॉरेस्ट गट नंबर २४९८ क्षेत्रापासून ५० मीटर अंतरावर तरस वन्यप्राणी यांनी सदर महिलेवर हल्ला केला. ही घटना आज शनिवार दुपारी घडली आहे.
सदर महिलेसच्या दोन्ही हातात चावा घेतल्याने ह्या जखमी झाल्या आहेत. प्राथमिक उपचार कोळे येथे श्री हॉस्पिटल येथे केले आहेत. यांच्या हाताला जखमेवर टाके घेऊन औषधोपचार करून कोळे येथील शासकीय दवाखान्यातील गाडीने मिरज येथे शासकीय दवाखान्यात पेशंटला उपचारासाठी पाठवले आहे.
पंचनामा जबाब कागदपत्रे केली. सोबत वनपाल कोळे वनरक्षक कोळे व वनमजूर होते. पेशंटला आर्थिक मदत वनपरीक्षेत्र अधिकारी श्री.तुकाराम जाधवर सांगोला यांनी दोन हजार रुपयाची तातडीची मदत केली.
यावेळी जाधवर यांनी जागेवर प्रत्यक्षात जाऊन ही कार्यवाही केली.या तरसाच्या हल्ल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.याबाबत कोणीही घाबरून न जादा वन विभागाशी संपर्क करावा असे,आवाहनही तुकाराम जाधवर यांनी केले आहे.