
सांगोला : प्रतिनिधी
बुद्ध भिमराज मागासवर्गीय बहुउदेशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. 20 मार्च 1927 रोजीच्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांकरिता पानपोई सुरु करण्यात आली.
पाणपोई सुरु करण्यामागचा उद्देश महामानावाचा विचार जपणे त्यांच्या विचारास अभिप्रेत समाज घडवणे व तशा प्रकारे समाजात क्रांती करणे हा महामानावांच्या वारसा जपण्यासाठी आणि सध्याची सांगोला तालुक्यातील उष्णता व तापमान पाहता सध्या शहरातील व तालुक्यातील जनतेला उन्हाचा त्रास होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी पाणी महत्वाचं असून त्यासाठी बुद्ध भिमराज बहुउदेशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सर्वांसाठी पाणपोई सुरु केली आहे.
यावेळी बुद्ध भिमराज मागासवर्गीय बहुउदेशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.ॲड.अक्षयदादा बनसोडे, उपाध्यक्ष – राज चंदनशिवे, उपाध्यक्ष-प्रशांत गायकवाड, सचिव- विशाल वाघमारे, सहसचिव- भारत हातेकर, सहसचिव -प्रविण मोहिते, खजिनदार – बंडू शिंदे, सहखजिनदार -अजय वाघमारे, आबा गुळीग, सागर राऊत, गणेश वायदंडे, प्रणय कांबळे, रोहित कांबळे, परमेश्वर ठोकळे, महादेव चंदनशिवे, लखन पवार, राहुल बनसोडे, रोहित चंदनशिवे, रोहित सोनवणे, रामचंद्र सोनवणे, समाधान कांबळे, लखन मोरे यांच्यासह इतर मान्यवर अमोल बनसोडे (अध्यक्ष) बापूसाहेब ठोकळे, दिपकराव बनसोडे वीर सावंत,नीलकंठ माने, आदि मान्यवर तर उदघाटक API माहूरकर साहेब, सांगोला नगरपालिका माजी नगराध्यक्ष मा. श्री मारुती आबा बनकर उद्योगपती बाळासाहेब झपके इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक(IGP) मा. श्री सुनील फुलारी साहेब यांचा सांगोला शहरांमध्ये पोलीस दलातील सर्वोच्च पदक राष्ट्रपती पदक पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाल्याबद्दल साहेबांचा बुद्ध भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांची वतीने अभिनंदनपर सत्कार संस्थेची ट्रॉफी शाल गुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अक्षयदादा बनसोडे यांचेसह सर्व पदाधिकारी सभासद कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.