जवळ्यासह १८ गावांत कंटेनमेंट झोन

नियम मोडणा-यांवर कडक कारवाईच्या सूचना

Spread the love

सांगोला (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या १८ गावांमध्ये संपूर्ण गावांमध्ये कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) जाहीर करण्यात आला अाहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कडलास, महूद, शिरभावी, अकोला, सोनंद, चोपडी, सावे, डोंगरगाव, जवळा, धायटी, एखतपुर, कमलापूर, खवासपूर, संगेवाडी, शिवणे, हलदहिवडी, मेडशिंगी आणि पाचेगाव बुद्रुक या गावांचा या कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.

कारवाईसाठी पथक
या कंटेनमेंट झोन गावांमध्ये कारवाईसाठी विविध विभागातील एकत्रित अधिकारी कर्मचाऱ्यांची पथकेही पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.

तालुक्यात ५०२ कोरोना रुग्णांवर उपचार
सांगोला तालुक्यामध्ये सध्या एकूण ५०२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली असून ११ हजार ६८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात काही गावांमध्ये सतत रुग्णवाढ होत आहे. तालुक्यातील दहापेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या १८ गावांमध्ये संपूर्ण कंटेनमेंट झोन जाहीर करून त्या गावांमध्ये संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ग्रामस्तरारीय कृती समिती करणार कारवाई
अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच या गावांमध्ये कोरोना चाचणी वाढविण्यात येणार आहेत. अशा गावांमधील ग्रामस्तरारीय कृती समितीने बंदच्या आदेशाचे व आदेशाचे पालन कोणी करत नसेल तर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची सूचना ग्रामस्तरारीय कृती समितीला दिल्या आहेत. नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहेत.

कंटेनमेंट झोन जाहीर केलेली गावे
कडलास, महूद, शिरभावी, अकोला, सोनंद, चोपडी, सावे, डोंगरगाव, जवळा, धायटी, एखतपुर, कमलापूर, खवासपूर, संगेवाडी, शिवणे, हलदहिवडी, मेडशिंगी आणि पाचेगाव बुद्रुक.

संपूर्ण तालुक्याचे निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोना रुग्णवाढीच्या १८ गावांमध्ये संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे व हा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे. अन्यथा नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी लागणार आहे. – अभिजित सावर्डे – पाटील, तहसीलदार , सांगोला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका