थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे शीघ्र कवितेसाठी जगात प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतीच एक भन्नाट कविता रचली आहे. ”हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर”, अशी शीघ्र कविता करत त्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला उद्देशून चोरमंडळ असा उल्लेख केला होता. ही टीका खासदार रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यावरच बोलताना नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ही आशयसंपन्न कविता केली आहे.
जोगेंद्र कवाडे शिंदे गटात आले पण महायुतीत सामील करताना चर्चा होणे अपेक्षित होतं, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. राज ठाकरेंना (Raj Thackeray) महायुतीत घेण्यास आमचा विरोध आहे. मी इथे असताना त्यांची गरज नाही. जास्त गर्दी करून उपयोग नाही. अशी प्रतिक्रिया आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, कोण चोर आहे, कोण तुरुंगामध्ये जाऊन आले ते सगळ्यांना माहीत आहे. 40 आमदार हिम्मतवाले आहेत. खरी शिवसेना त्यांचीच आहे, न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागेल.
आमचा अडीच वर्ष उपमहापौर
प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले त्याचा फायदा आम्हालाच होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. बहुजन विकास आघाडीने ठाकरे गटासोबत युती केली आहे, यावर बोलताना रामदास आठवले असे म्हणाले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी मी जेव्हा गेलो तेव्हाच यायला पाहिजे होते. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचितचा ठाकरे गटाला फायदा होणार नाही.
मुंबईत आम्ही ताकदवान आहोत. मुंबई महापालिका भाजपा जिंकेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. आमचा अडीच वर्ष उपमहापौर होईल, असे ठरल्याचे आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.
मी इथे असताना राज ठाकरेंची गरज नाही