10 हजार भाविकांना विठ्ठल दर्शन

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची तयारी पूर्ण; मंदिर समितीची बैठक संपन्न

Spread the love

पंढरपूर/ डॉ. नाना हालंगडे

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरीता दररोज ऑनलाईन बुकींग केलेल्या 5 हजार तर बुकींग न करता आलेल्या 5 हजार असे एकूण 10 हजार भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. या भाविकांना पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन घेता येणार आहे. आरोग्य तपासणी करूनच दर्शनाकरीता भाविकांना मंदीरात सोडले जाणार आहे. मंदिर समितीकडून तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

जगभरातील फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम ठप्प

श्रीकांत देशमुख यांना पत्रकारांनी धरले धारेवर

घटस्थापनेच्या मुहूर्तावर दि. 7 ऑक्टोबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर, प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनाकरीता खूली करण्यात येणार आहेत. त्या पार्श्‍वभुमिवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही दर्शनाकरीता भाविकांना सोडण्यात येणार आहे. मात्र पदस्पर्श ऐवजी मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. या संदर्भातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मंगळवारी बैठक पार पडली.या बैठकीत दररोज 10 हजार भाविकांना मुखदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा नवरात्रोत्सव फक्त आठ दिवसांचा

विजया दशमीपासून सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे. तासाला 700 ते 1000 भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामधे 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे. दर्शनास येणार्‍या भाविकांची कोरोना चाचणी सक्तीची असणार नाही. मात्र दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तर मंदिरांमध्ये काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.
पहिल्या आणि दुसर्‍या लाटे दरम्यान राज्यातील मंदीरे बंद होती. त्यामुळे मंदीरावर अवलंबून असलेले लोक, त्यातच नागरिकांना आपल्या देवाचे दर्शन घेता येत नव्हते. आता राज्य सरकारने र् मिशन बिगीन अगेन, च्या अंतर्गत कोरोना नियमांचं पालन करुन भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजीराजे शिंदे, साधनाताई भोसले,शकुंतला नडगिरे, प्रकाश जवंजाळ, शिवाजीराव मोरे,ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर आदी उपस्थित होते.

यांना दर्शन मिळणार नाही

श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाकरीता 10 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली आहे. मात्र, ऑनलाईन बुकींग करुन येणार्‍या भाविकांची संख्या 5 हजारापेक्षा कमी राहिली तर त्यावेळी स्पॉट बुकींग करुन दर्शन व्ययवसव्था केली जाणार आहे.

अशी असेल दर्शन नियमावली

*घटस्थापनेच्या मुहूर्तावर दि. 7 ऑक्टो.पासून मुख दर्शन
* सकाळी 6 ते 7 या वेळेत स्थानिक भाविकांना दर्शन
* सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत ऑनलाईन बुकींग केलेल्या
5 हजार भाविकांना तर बुकींग न केलेल्या 5 हजार भाविकांना दर्शन
*ऑनलाईन बुकींगची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध
* भाविकांसाठी आरोग्य सुविधा देण्यात येणार
* मंदिरात हार, फुले घेवून जाण्यास मनाई
* अन्नक्षेत्र व लाडू प्रसाद विक्री बंदच राहिल
*दर्शनासाठी जाताना कासार घाट येथे तपासणी करण्यात येईल
*भाविकांना श्रींची पूजा उपलब्ध करुन देता येणार नाही
*एका वेळी 5 च्या जथ्याने भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यात येईल
* दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी पुरावा आणणे आवश्यक आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका