ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी

हंगिरगेतील प्रांजली बनली वकील

झाडवाले ग्रामसेवक बिभीषण सावंत यांच्या कन्येची उत्तुंग भरारी

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील हंगीरगे गावची कन्या प्रांजली बिभीषण सावंत हिने कायद्याचा पदवी परीक्षेत उत्तुंग असे यश संपादन केले बदल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तिने एन. एस.सोट्टी लॉ कॉलेज सांगलीमध्ये पाच वर्षाच्या कायद्याच्या अभ्यासक्रमामधे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन अखेरच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाची उज्वल परंपरा राखली आहे.

प्रांजलीची कौटुंबिक पार्श्वभूमी डोळ्यात अश्रू आणणारी आहे. बाप जरी ग्रामसेवक असले तरी त्यांनी सर्व सेवा गोरगरिबांना मदत करण्याचं आपली हयात घालविली.

 

ग्रामीण भागातील रहिवासी असलेली कन्या प्रांजली ही तल्लख बुद्धीची. वडील ग्रामसेवक पण सदैव जनसेवेतच व्यस्त. अशातच आपल्या दोन नंबरच्या कन्येला कायदेतज्ञ बनवीत गोरगरिबांची सेवा करण्यात वकील केले. हाच मुलीचा बाप सांगोला तालुक्यात झाडवाला बाबा म्हणून,सुपरिचित आहे.

ॲड.प्रांजली हिने या परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्यानंतर ती म्हणाली की, माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा फायदा गोरगरीबाना न्याय मिळवून देण्यासाठी करणार व पुढील उच्च शिक्षण घेणार आहे. माझ्या समोर या तालुक्याचे बाग्याविधाते व कायद्याचे पदवीधर कै.डॉ.गणपतराव देशमुख हे आदर्श आहेत. प्रेरक व मार्गदर्शक राहणारे माझे वडील व आईच्या प्रेरणेमुळे कायद्याच्या पदवीला एडमिशन घेतले.

तुमच्या घरातील हे चॅनल्स होणार बंद

 

माझे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जि. प. प्रा .शाळा हंगीरगे येथे झाले व पाचवी ते बारावी शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल सांगोला येथे झाले. कायद्याचे शिक्षण एन एस सोटी लॉ कॉलेज सांगली येथील सरकारी कॉलेज मधे पूर्ण झाले. पुढील उच्चशिक्षण पण चालू ठेवणार आहे. तसेच कायद्याच्या स्पर्धा परीक्षाही देणार आहे. वकिली हा व्यवसाय म्हणून न करता गोरगरिबांना न्याय देण्यासाठी करणार आहे. याही पुढचे ध्येय म्हणजे न्यायाधीश होणे आहे.

मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. तुझ्या या उत्तुंग यशाबद्दल आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो. त्याहूनही कौतुक करावसे वाटते ते तुला भाग्याने तुला जन्म दिलेल्या तूझ्या वडिलांचं. खरंच आख्खी जिंदगी जनसेवेसाठी झिजवता झिजवता स्वतःच्या कन्येला आज वकील बनवलं. कौतुकास पात्र दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. प्रांजली तुला तुझ्या विधी, कायदेतज्ञ सेवेसाठी खूप साऱ्या शुभकामना. एक नामांकित वकील व्हावीस याच अपेक्षा आणि पुन्हा एकदा मनस्वी अभिनंदन. – गणेश पाटील

घटस्थापना-नवरात्रोत्सव शेतीचा शोध लावणाऱ्या महामातांचा सन्मान!

रवीश, तू जीवंतपणीच इतिहास झालाय!

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका