शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सायकलींचे वाटप

बुरंगेवाडीत १५ व्या वित्त आयोगातून झाला कार्यक्रम

Spread the love

बुरंगेवाडी ग्रामपंचायतीवर गेली कित्येक वर्षापासून शेकापची सत्ता असून, गावाचा चौफर विकास झाला आहे. शेकापची ज्या ज्या ग्रामपंचायतीत सत्ता आहे तेथे विकासकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. बुरंगेवाडी ग्रामपंचायतही विकासकामांमध्ये आघाडीवर आहे. या गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत शेतकरी कामगार पक्षाकडून केली जाईल. – डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला/ नाना हालंगडे
तालुक्यातील बुरंगेवाडी येथे १५ व्या वित्त आयोगातून १० मुलींना सायकलींचे वाटप व शाळेच्या संरक्षण भिंतीच्या पायभरणीचा कार्यक्रम शेकापचे युवक नेते डॉ. बाबासाहेब देशमुख व सरपंच रजाक्का बुरंगे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

बुरंगेवाडी ग्रामपंचायतीवर गेली कित्येक वर्षापासून शेकापची सत्ता असून, गावाचा चौफर विकास केलेला आहे. अशातच ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून १० सायकली व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी देण्यात आला. तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बुरंगे व गिरजाप्पा बुरंगे यांनीही तीन सायकली यावेळी दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, ग्रामपंचायत हे देवालय आहे. सर्वांनी यामध्ये सामावून कामे केली तर विकास व्हायला वेळ लागत नाही. सर्व योजना तळागाळातील गोर गरीबांना देवून विकास साधा,आजचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. शाळेतील मुलांनाही योजना द्या, असेही देशमुख यांनी सांगितले.

यावेळी ग्रामसेविका सोनलकर मॅडम यांनी ग्रामपंचायत कार्याचा आढावा सांगून मुलांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवून आपले व आपल्या कुटुंबाचे नाव उज्जल करावे असेही आवाहन यांनी केले.

यावेळी अर्जुन बुरंगे, राजू गावडे, मायाप्पा यमगर, आनंदराव यमगर, शरद खताळ, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका