ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

भोपसेवाडी ग्रामपंचायतीवर शेकापचा लाल बावटा फडकला

सरपंचपदी रंजना श्रीपती वगरे विराजमान

Spread the love

पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते भोपसेवाडीच्या नूतन सरपंच रंजना श्रीपती वगरे यांचा सत्कार करण्यात आला. नूतन सरपंच रंजना वगरे यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नूतन सरपंचांचे अभिनंदन केले. भोपसेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण तळागाळातील लोकांपर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. भोपसेवाडी ग्रामपंचायतचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीपती वगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगोला / नाना हालंगडे
भोपसेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या रंजना श्रीपती वगरे तर उपसरपंचपदी सोपान भगवान बंडगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी गावाच्या सरपंच सौ सखुबाई नरळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे व रंजना वगरे आणि उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच व उपसरपंच पद रिक्त झाले होते गावातील ज्येष्ठ मंडळींनी संपूर्ण गावाची मीटिंग 18 सप्टेंबर 2022 रोजी बिरोबा मंदिर भोपसेवाडी या ठिकाणी घेऊन सर्व गावकऱ्यांशी विचार विनिमय करून सरपंचपदी सौ रंजना वगरे व उपसरपंच पदी श्री सोपान बंडगर यांची निवड करण्याचे सर्वानुमते ठरले. ठरल्याप्रमाणे 18 नोव्हेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय भोपसेवाडी या ठिकाणी सरपंच उपसरपंच पदाची निवड पार पडली.

यामध्ये सरपंच म्हणून सौ रंजना श्रीपती वगरे व उपसरपंच म्हणून सोपान भगवान बंडगर यांचे बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर प्रथम स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नूतन सरपंच सौ रंजना वगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, गोरगरीब जनतेची सेवा करून शेतीसाठी म्हैशाळ योजनेतून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावणारच आहे.गावच्या सर्वागीण चौफेर विकासासाठी मी स्वतः चोवीस तास कठीबद्ध राहणार आहे.विशेषता महिला वर्गासाठीही शासनाच्या नाविन्यपूर्ण राबवून त्यांच्याही विकास साधणार आहे.उपसरपंच सोपान बंडगर यांनी गावातील जेष्ठ मंडळी व युवकांच्या मार्गदर्शनाखाली गाव सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर ठेवू असे सांगितले. यावेळी महेश बंडगर यांनी मार्गदर्शन केले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी जाधव, ग्रामसेवक पांडुरंग बुरुंगले ग्रामपंचायत कर्मचारी वसंत कोरे, पोपट आगलावे यांनी ही निवडणूक पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सदर प्रसंगी सूतगिरणीचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय कोरे, श्रीपती वगरे सर ,माजी उपसरपंच बसवंत यमगर,पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदरावजी यमगर, सभापती मायाप्पा दादा यमगर,माजी सरपंच बिरा गावडे, शिवाजी मळगे महाराज,बाळू कोरे, शंकर श्रीराम, गोपाळ गुरव, अंकुश आगलावे, कृष्णा गुरव ,सुरेश वगरे ,दशरथ बंडगर, अंकुश वगरे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते भोपसेवाडीच्या नूतन सरपंच रंजना श्रीपती वगरे यांचा सत्कार करण्यात आला. नूतन सरपंच रंजना वगरे यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नूतन सरपंचांचे अभिनंदन केले.

भोपसेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण तळागाळातील लोकांपर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. भोपसेवाडी ग्रामपंचायतचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीपती वगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

देशात हजारो निर्घृण हत्या, श्रद्धा-आफताब प्रकरणाचीच का चर्चा?

संविधान दिवस साजरा न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

प्रकाश आंबेडकर यांचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली बैठक

कटफळची मिरची ठसकेबाज

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका