भेंडी खा आणि रोगांना पळवा

तुम्ही खात असलेली भेंडी किती बहुगुणी आहे ते वाचा

Spread the love

सांगोला : डॉ. नाना हालंगडे
भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषक तत्वे असून, नियमित भेंडीचे सेवन केल्यास कॅन्सरसारख्या रोगापासून आपला बचाव होतो. भरपूर प्रमाणात असलेल्या व्हिटॅमिन ‘सी’सह रोगप्रतिकारक शक्तीसह ही भाजी बहुगुणी असल्याचे सिद्ध झाले आहे. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए, बी, सी, ई व के तसेच कॅल्शिअम, लोह, जस्त असते. तसेच जास्त प्रमाणात फायबरसुध्दा असते.

भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकाराची पोषक तत्वे आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखी जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.

कॅन्सरपासून होतो बचाव
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी तत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारख्या रोगाचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यावरही भेंडी गुणकारी आहे.

डायबिटीजपासून बचाव
भेंडीत असलेल्या यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

वजनही होते कमी
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.

भेंडी वाढवते रोगप्रतिकारक शक्ती
भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनसत्त्व असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे डोळ्यांना निरोगी ठेवते.

मधुमेहींसाठी औषध
मधुमेहींसाठी भेंडी गुणकारी आहे. याबाबत आहारतज्ज्ञ सातत्याने मांडणी करताना दिसतात. मधुमेहींसाठी भेंडी कशी गुणकारी आहे हे आपण पाहूया. यासाठी प्रथम दोन भेंड्या घ्याव्यात. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे टोक कापून टाकावे. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !

भेंडीचे फायदे
१. कॅन्सर
भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कॅन्सरला दूर ठेवू शकता. कोलन कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करतात.

२. हृदय
भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.

३. डायबिटीज
यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खूप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.

४. ॲनिमिया
भेंडी ॲनिमियासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयर्न हिमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.

५. पचनतंत्र
भेंडी ही भरपूर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाहीत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका