भीषण आगीने सोलापूर हादरले

सात मजली इमारतीला आगीचा वेढा

Spread the love

सोलापूर : सोलापूर शहरातील रेल्वे लाईन्स भागात असलेली सात मजली 7th हेव्हन या इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत पार्किंगमधील चारचाकी व दुचाकी वाहने जळून खाक झाली. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सायंकाळी 5:30 च्या सुमारास आग लागली. आगीच स्वरूप रुद्र होतं. पार्किंगमधील अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहन तसेच उत्सव मंडळाचे साहित्य, मेडिकल दुकानाचे साहित्य इतर फर्निचर जळून खाक झाले. आग आणि धुराचे लोट प्रचंड उसळले होते.

या घटनेमुळे इमारतीतील विद्युत पुरवठा खंडित झाला. वरच्या मजल्यावर राहणारे लोक गच्चीवर गेले. यात वृद्ध आणि मुलांचाही समावेश होता. आगीच्या धुराने जिन्यामध्ये तसेच इमारतीतील प्रत्येक घरांना वेढा दिला. सर्वांनी टेरेसवर जाऊन जीव वाचविण्याच्या प्रयत्न केला.


48 फ्लॅटची ही इमारत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या पाणी फवारणी करत होत्या. तरीही आग दोन तास आटोक्यात आली नाही. अग्निशमन अधीक्षक केदार आवटे स्वतः आग नियंत्रणामध्ये सहभागी झाले होते. अखेर जेसीबीने दर्शनी भाग फोडून पाणी फवारणी तसेच फोम फवारणी करावी लागली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर तसेच पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे आणि पोलिस फोर्स काही वेळातच पोहोचले.

नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले शेजवाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना इमारतीतून बाहेर काढण्यात मदत केली. स्वतः उपायुक्त बांगर आणि कडूकर यांनी गच्चीवर जाऊन तेथे थांबलेल्या वृद्ध आणि महिलांना सुरक्षित खाली आणण्यात मदत केली. घटनास्थळी पालिका आयुक्त पी शिवशंकर महापौर श्रीकांचना यन्नंंम यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री आठ तीस सुमारास आग आटोक्यात आली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका