थिंक टँक स्पेशलराजकारण

उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा : नारायण राणे

Spread the love

मुंबई : “शिंदे (Maharashtra Cm Eknath Shinde) गटालाच दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava) शिवाजी पार्कवर परवानगी मिळेल. शिवाय धनुष्यबाणही शिंदेंकडेच राहणार आहे. चांगल्या गोष्टींचं कायम कौतुक करावं, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा, माझ्याकडे चांगली वाक्य आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी लगावलाय.

राणेंची भ्रांती आणि पवारांची औद्योगिक क्रांती

नारायण राणे यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या (shiv sena) दसरा मेळाव्याबाबत बोलताना यावर कोर्टातून निकाल लागेल असे मत राणे यांनी व्यक्त केले. याबरोबरच कोकणातील नाणार प्रकल्प हा कोकणातच राहिल असे देखील यावेळी नारायण राणे म्हणाले. “नाणार होणारच आणि तोही कोकणातच होणार, कोणाचाही विरोध चालू देणार नाही.

नाणार प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः मंत्री आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, असे राणे म्हणाले. “2024 ला भाजपचे 403 खासदार असतील, गोवा आणि दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असेल. शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपच्या मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हाच संपलं,

उध्दव ठाकरे देशात आणि राज्यात कुठेही नाहीत, फक्त मातोश्रीच्या कक्षेत त्यांचे अस्तित्व आहे, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. नारायण राणे म्हणाले, “लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत केंद्र सरकार करत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरची घोषणा केली, यासाठी उद्योग क्षेत्रात प्रगती होणं गरजेचं आहे. रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, निर्यात वाढायला पाहिजे. GDP वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका