‘हे’ वाचलंत तर अर्णब गोस्वामींना तुम्ही माणूस मानणार नाही

श्रीरंजन आवटे यांचा मार्मिक लेख

Spread the love

प्रिय,

अर्णब गोस्वामी यांचं व्हाॅटस्अॅप चॅट वाचलंत ?
नसेल, तर नक्की वाचा.

मी अर्णब गोस्वामींचे शो पहात नाही. मला ते कधीही अभ्यासपूर्ण, संतुलित वाटले नाहीत. एखादा शो थोडा पाहिला तेव्हाच सत्तेच्या आक्रस्ताळ्या कर्णकर्कश्य आवाजाने माझे कान किटून गेले.
तुम्हाला कदाचित अर्णब आवडत असतील. ठीकय.
पण अर्णब आवडणं/नावडणं, त्यांना समर्थन करणं/ विरोध करणं म्हणजे जणू मला नारिंगी रंग आवडतो तुम्हाला पिवळा रंग आवडतो तर काय प्रॉब्लेमय, असं आहे का ?
अजिबातच नाही !

हे चॅट वाचल्यावर मी काय म्हणतोय, तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला धक्का बसेल. हे चॅट मुंबई पोलिसांनी स्वाक्षरीसह न्यायालयात सादर केलेले आहे त्यामुळे ते सत्य मानायचे तरः बालाकोट एअर स्ट्राइकची कल्पना अर्णब यांना आधीच होती !

स्वाभाविकच सैन्याच्या कारवाईविषयी त्यांना आधीच माहिती असणं हे ऑफिसियल सिक्रेटस ऍक्टनुसार अतिशय गंभीर आहे वगैरे मुद्दे समोर येत आहेत. त्यानुसार काय कायदेशीर कारवाई व्हायची ती होईल किंवा कदाचित फार काही त्यांना धक्का लागणारही नाही. अर्णब हे अगदी मोदीशहांच्या परिवाराचाच एक भाग असल्याने यामुळे मला अजिबात धक्का बसला नाही. अशी माहिती घरातल्या माणसाला मोदीशहा सांगणार नाही तर कुणाला !

मला वाईट वाटलं, धक्का बसला तो वेगळ्या कारणाने. पुलवामात आपले जवान शहीद झाल्यानंतर अर्णब यांनी अधिक टीआरपी मिळाला म्हणून आनंद व्यक्त केला ! माझ्यासाठी ही बाब अतिशय गंभीर आहे.
देशासाठी कुर्बान झालेल्या जवानांची बातमी ऐकून कुणाला आनंद होत असेल तर त्या व्यक्तीला मी माणूस मानत नाही.

माझं या देशावर प्रेम आहे.
माझ्या जवानांचा मला अभिमान आहे.
त्यांच्या बलिदानावर जर राजकीय पोळ्या भाजण्याचा कार्यक्रम कुणी केला असेल तर तो तुम्हाला लखलाभ !

पुन्हा एकदा सर्वेश्वरदयाल सक्सेनांच्या कवितांच्या ओळीत सांगायचं तरः

“यदि तुम्हारे घर के
एक कमरे में आग लगी हो
तो क्या तुम
दूसरे कमरे में सो सकते हो?
यदि तुम्हारे घर के एक कमरे में
लाशें सड़ रहीं हों
तो क्या तुम
दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो?
यदि हाँ
तो मुझे तुम से
कुछ नहीं कहना है।”

और मुझे तो आपसे कुछ कहना है.
उम्मीद है की आपके अंदर का इन्सान जिंदा होगा !

श्रीरंजन आवटे

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका