हुलजंतीत महालिंगराया व बिरोबा भेटीचा अभूतपूर्व पालखी सोहळा होणार
उद्या मुख्य कार्यक्रम ; मुख्य नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
महाराष्ट्रातील जागृत, श्री हालमत संप्रदायातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून हुलजंती (ता. मंगळवेढा) महालिंगरायाची सर्वदूर ख्याती आहे. बिरोबा व महालिंगराया यांची भेट सोहळा हा प्रसिद्ध आहे. दोन वर्षाच्या कोरोना कालावधीत सव्वातीनशे वर्षाची परंपरा खंडित पडली होती. यावर्षी हन्नूरचा बिरोबा (गुरू) व महालींगराया या गुरु-शिष्यांच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे आशा निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र-आंध्रप्रदेश, कर्नाटकातील भक्तगण आनंदित आहेत. हा दिव्य सोहळा याचि देही याचि डोळा असा लाखों भक्तगणांना अनुभवता येणार आहे.नुकतीच पट्टणकोडोली ची यात्रा पार पडली आहे. त्यामुळे ही यात्रा होणार आहे.
गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल वाजवीत प्रत्येक पालखी महालिंगराया पालखीची भेट होताना महालिंगराया-बिरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आकाशात भंडारा,लोकर व खोबरे उधळण्यात करण्यात येते. नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर गजबजून जातो. हा पालखी भेट सोहळा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व गोवा राज्यातून दाखल झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. हा गुरू शिष्याचा नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्याचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव चडचण येथील शिरढोण येथील बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होत आहे. हा भक्तिमय सोहळा आठवडाभर सुरू असतो.
महालिंगराया या वीर पुरुषाने बारामती येथे मासाळ घराण्यात जन्म घेतला. महालिंगराया अनेक भक्तांच्या लीलिया साठी चमत्कार करून दाखवले. दुष्टांवर प्रहार ,संहार केला. सज्जनांचे रक्षण केले. समाज जागृती केली. गुरु बिरोबा यांना गुरुस्थानी सेवा कसी करावी हे महालिंगराया च्या भक्तीतून मूर्तिमंत उदाहरण सांगता येईल. मंगळवेढा पासून दक्षिणेला अठरा किलोमीटर अंतरावर हुलजंती (दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते) हे गाव वसले आहे या गावास धार्मिक महत्त्व या देवस्थानांमुळे प्राप्त झाले आहे. बाराव्या शतकातील दगडी व कोरीव आकर्षक मंदिरबांधकाम आहे . स्वागत कमानी चे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सहाजिकच या ठिकाणी गेल्यावर थोडा वेळ थांबल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
हुलजंती – महालिंगराया व जत धार्मिक संबंध
महालिंगराया हुलजंती येथील मुख्य यात्रेच्या दिवशी देवाच्या नैवेद्याचा मान जत येथील डफळे संस्थानिक राजघराण्याला राजेना आहेे. तो आज ही पूर्वापार पारंपरिक पद्धतीने जपला जात आहे. महालिंगरायाचे गुरु बिरोबा देव मंगळवेढा तालुक्यातील हन्नूर येथील असून पूर्वी हे गाव आजच्या डफळे संस्थानिकात होते. आज ही दोन्ही देवस्थान या ठिकाणी डफळे संस्थानिकातील राजेंना मान दिला जातो. हन्नुर हे जत तालुक्यातील येळवी गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील देवस्थान आहे. तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून दोन्ही देवस्थान धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते.जत तालुक्यातील उटगी येथील भरमदेव , सोन्याळ येथील विठुराया या देवांच्या पालख्या या भेटी सोहळ्यासाठी मानाच्या असतात. त्यामुळे धार्मिक संबंध मोठ्या प्रमाणात आजही जोपासले जात आहेे.