हीच खरी आबासाहेबांना श्रद्धांजली : महादेव जानकर
भाईंची देवराई पाहून जानकर भारावले
सांगोला/ विशेष प्रतिनिधी
एकाद्या नेत्यांच्या नावे झाडे लावून त्यांची जपणूक करणे हे खूप मोठे काम आहे. आज आमच्या पत्रकार मित्रांचा सन्मान करणे हे गरजेचे आहे. त्यांनी देशात इतिहास निर्माण करणाऱ्या भाई स्व.गणपतराव देशमुख यांच्या नावेच देवराई उभारून राज्यातच इतिहास निर्माण केला आहे. हे खूप मोठे काम आहे. हीच खरी आबा साहेबांना श्रद्धाजली असल्याचे,माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भेटी दरम्यान सांगितले.
भाईंची देवराई हा प्रकल्प गतवर्षी ऑगस्ट 2021 मध्ये उभारण्यात आला असून यामध्ये देवराई, घण वन आणि फळबाग अशी 118 जातीची अकराशेच्या आसपास झाडे आहेत.अवघ्या एका वर्षातच या देवराई प्रकल्पाने भरारी घेतली असून अनेक मान्यवर मंडळींनी यास भेट दिलेली आहे.
रविवार 11 सप्टेंबर 2022 रोजी माजी मंत्री महादेव जानकर यांनी अचानकच भेट देत सर्वांनाच अचंबित केले. यावेळी राज्य सर चिटणीस सोमा मोटे, डिकसळचे माजी सरपंच संतोष करांडे, दादासाहेब भुसनर, काकासाहेब करांडे, अशोक मोटे,महादेव गोरड,बापू करांडे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जानकर म्हणाले की, स्व. आबासाहेब हे संपूर्ण राज्याचे आदर्श असे नेते होते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासारखा होता.ते विधीमंडळात बोलताना अख्ये सभागृह स्तब्ध असे असायचे. अशाच थोर नेत्यांच्या नावाने देवराई प्रकल्प उभारला आहे. हे राज्यासाठी भूषणावह आहे. याच देवराई मधून त्यांच्या आठवणी जपत आपण सर्वांनी काम करावयाचे आहे.एखाद्या नेत्यांसाठी दोन एकर स्वतःची शेतजमीन देत,आमच्या पत्रकार मित्राने,मनाचा मोठेपणा दाखविला आहे.हेही खूप मोटे काम आहे.
आगामी जिल्हा परिषद,आणि पंचायत समिती निवडनुकात सांगोला तालुक्यात तर राष्ट्रीय समाज पक्ष विजयाचा झेंडा रोवणार असून,देशातील चार राज्यात ही राष्ट्रीय समाज पक्ष इतिहास निर्माण करणार आहे.
पाहा खास व्हिडिओ