हातभट्टीवाल्यांनो, सुधरा.. दुसरा धंदा करा
एसपी तेजस्वी सातपुते यांचे "ऑपरेशन परिवर्तन"
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) हातभट्टी दारुची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून तिची विक्री देखील होत आहे. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उदध्वस्त होत असून वेळप्रसंगी काही लोकांना प्राणास देखील मुकावे लागते. यासाठी सोलापूरच्या ग्रामीण पोलिस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुतेे (S. P. Tejaswi Satpute) यांनी सोलापूर जिल्ह्यात “ऑपरेशन परीवर्तन” हे अभियान सुरू केले आहे.
जिल्ह्यातील हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणारी एकूण ७१ ठिकाणे Hotspot
यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणारी एकूण ७१ ठिकाणे ही Hotspot म्हणून निश्चीत करण्यात आली असून सदर ठिकाणे ही पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकारी यांना दत्तक म्हणून देण्यात आलेली आहेत. यामध्ये पालक अधिकारी यांनी सदर गावातील ठिकाणीवरील अवैध दारूबंदी निर्मिती व विक्री बंद करणे, सदर व्यवसायातील लोकांना परावृत्त करणे, त्यांना दुस-या कायदेशीकर उद्योगाकडे वळवणे , त्यासाठी कर्ज / शासकीय मदत मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पोलिस अधिका-यांनी घेतली गावे दत्तक
श्रीमती तेजस्वी सातपुते (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) यांनी मुळेगाव तांडा (ता.दक्षिण सोलापूर) व श्री. अतुल झेंडे , अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर यांनी भानुदास तांडा (ता. द. सोलापूर) हे तांडे दत्तक घेतले आहेत.
आमच्या Whatsaap Group मध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc
मुळेगाव तांडा येथे धडक कारवाई
या योजनेमध्ये शनिवारी दोन्ही अधिका-यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक घेवून दोन्ही तांड्यावरील अवैध हातभट्टी निर्मिती करणा-या ठिकाणी छापे (Police Raid) टाकले. त्यामध्ये दीडशे लिटर तयार दारू व ४८ हजार २०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- हेही वाचा : शहाजीबापू व दीपकआबांचा लोटेवाडीत भरपावसात सत्कार
- विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ
- सोलापूरात मोफत पेट्रोल भरण्यासाठी उडाली झुंबड
- सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेगाभरती
- तिसऱ्या लाटेचा धोका, बेड कधीही ताब्यात घेणार : पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र
अन् हातभट्टीवाल्या युवकाने स्वत:ची भट्टी जेसीबीने केली उद्ध्वस्त
मुळेगाव तांडा येथे छापा कारवाई केल्यानंतर गावातील तरूण मुलांना देखील श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी दारूमुळे होणारे दुष्परीणाम व त्यापासून परावृत होण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये सदर गावातील राज चव्हाण या इसमाने स्वत:ची दारूची भट्टी स्वत : जेसीबी मशीनने नाश केली असून यापुढे हातभट्टीची दारू गाळणार नसल्याचे सर्वासमक्ष जाहीर केले.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत अशी कारवाई चालणार आहे. सर्वत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुळेगाव व भानुदास तांडा येथील कारवाईमध्ये श्रीमती तेजस्वी सातपुते (पोलीस अधीक्षक) , श्री.अतुल झेंडे (अप्पर पोलीस अधीक्षक), श्री.सर्जेराव पाटील, श्री. अरुण फुगे (पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन), श्री. काजुळकर (राखीव पोलीस निरीक्षक), पोलीस मुख्यालय , सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला.