हंगीरगेत रात्रीच्या लसीकरणात 54 जणांना लस
कवच कुंडल अभियानास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला / नाना हालंगडे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुरू केलेले कवच कुंडल अभियान राज्यभर यशस्वी होत असून, १८ वर्षांवरील सर्वासाठी पहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. मंगळवार दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी रात्री ७ ते ८:३० या वेळेत ही लसीकरण मोहीम तालुक्यातील हंगीरगे उपकेंद्रात राबविण्यात आली. यामध्ये ५४ जणांना लसीची टोचणी करण्यात आली.
८ ते १४ ऑक्टोंबर दरम्यान हे कवच कुंडल अभियान राबविण्यात आले असून तालुक्यातील सर्वच गावामध्ये हे घर ते घर लसीकरण घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिवसा बरोबर रात्री ७ ते ८:३० या वेळेतही लसीची टोचणी काल हंगीरगे उपकेंद्रात करण्यात आली. यावेळी कामावरून घरी आलेल्या ५४ जणांना ही लस देण्यात आली. ही तालुक्यातील पहिलीच मोहीम आहे.
यामध्ये या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी_ दत्तात्रय खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका मैना माने यांनी हे लसीकरण केले. यावेळी सुरेश काटे, विलास पावणे, अर्जुन लांडगे यांच्यासह आरोग्य विभागाचे अन्य कर्मचारी व गावातील लोकप्रतिनिधी यांनी मदत केली. रात्रीचे हे लसीकरण तालुक्यात पहिल्यांदा घेण्यात आले.