हंगिरगेतील प्रांजली बनली वकील
झाडवाले ग्रामसेवक बिभीषण सावंत यांच्या कन्येची उत्तुंग भरारी
थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील हंगीरगे गावची कन्या प्रांजली बिभीषण सावंत हिने कायद्याचा पदवी परीक्षेत उत्तुंग असे यश संपादन केले बदल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिने एन. एस.सोट्टी लॉ कॉलेज सांगलीमध्ये पाच वर्षाच्या कायद्याच्या अभ्यासक्रमामधे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन अखेरच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाची उज्वल परंपरा राखली आहे.
प्रांजलीची कौटुंबिक पार्श्वभूमी डोळ्यात अश्रू आणणारी आहे. बाप जरी ग्रामसेवक असले तरी त्यांनी सर्व सेवा गोरगरिबांना मदत करण्याचं आपली हयात घालविली.
ग्रामीण भागातील रहिवासी असलेली कन्या प्रांजली ही तल्लख बुद्धीची. वडील ग्रामसेवक पण सदैव जनसेवेतच व्यस्त. अशातच आपल्या दोन नंबरच्या कन्येला कायदेतज्ञ बनवीत गोरगरिबांची सेवा करण्यात वकील केले. हाच मुलीचा बाप सांगोला तालुक्यात झाडवाला बाबा म्हणून,सुपरिचित आहे.
ॲड.प्रांजली हिने या परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्यानंतर ती म्हणाली की, माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा फायदा गोरगरीबाना न्याय मिळवून देण्यासाठी करणार व पुढील उच्च शिक्षण घेणार आहे. माझ्या समोर या तालुक्याचे बाग्याविधाते व कायद्याचे पदवीधर कै.डॉ.गणपतराव देशमुख हे आदर्श आहेत. प्रेरक व मार्गदर्शक राहणारे माझे वडील व आईच्या प्रेरणेमुळे कायद्याच्या पदवीला एडमिशन घेतले.
माझे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जि. प. प्रा .शाळा हंगीरगे येथे झाले व पाचवी ते बारावी शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल सांगोला येथे झाले. कायद्याचे शिक्षण एन एस सोटी लॉ कॉलेज सांगली येथील सरकारी कॉलेज मधे पूर्ण झाले. पुढील उच्चशिक्षण पण चालू ठेवणार आहे. तसेच कायद्याच्या स्पर्धा परीक्षाही देणार आहे. वकिली हा व्यवसाय म्हणून न करता गोरगरिबांना न्याय देण्यासाठी करणार आहे. याही पुढचे ध्येय म्हणजे न्यायाधीश होणे आहे.
घटस्थापना-नवरात्रोत्सव शेतीचा शोध लावणाऱ्या महामातांचा सन्मान!
पाहा खास व्हिडिओ