सोलापूरात मोफत पेट्रोल भरण्यासाठी उडाली झुंबड
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
सोलापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यशदा युवती फाउंडेशनच्या वतीने सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जात आहे. हे पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज (४ सप्टेंबर) रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने यशदा युवती फाउंडेशनच्या वतीने सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जात आहे. सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल यांनी दिली.
आमच्या WhatsAap Group मध्ये ज्वाईन व्हा https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc
मोफत पेट्रोल मिळविण्यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील हे नाव असणाऱ्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड सोबत आणावयाचे आहे. त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येणार आहे.
या उपक्रमावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
- हेही वाचा : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेगाभरती
- जगाला हेवा वाटेल असे अहिल्यादेवींचे स्मारक सोलापूरात साकारणार
- सोलापूर महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
- तिसऱ्या लाटेचा धोका, बेड कधीही ताब्यात घेणार : पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र
- महाराष्ट्राचे राजकारण तिसऱ्या लाटेवर स्वार