सोलापूरात थेट कचरा डेपोतच ॲड. असीम सरोदे यांची पत्रकार परिषद
मंगळवारी दुपारी १२ वाजता तुळजापूर रोड कचरा डेपो येथे आयोजन
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
सोलापूर शहरातील कचरा अव्यवस्थापन व तुळजापूर रोड कचरा डेपो परिसरात निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न यासंदर्भात सोलापूरच्या नागरिकांनी आता थेट कचरा डेपो परिसरातच मानवी हक्क विश्लेषक व पर्यावरण कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांची पत्रकार परिषद आयोजित केली आहे.सोलापूरकरांच्या आरोग्य समस्यांसोबतच कचरा डेपोचे स्थलांतर करण्याबाबत सुद्धा कायदेशीर विवेचन या संवाद कार्यक्रमातून करण्यात येईल असे लॉयर्स फॉर अर्थ जस्टीसचे समन्वयक अॅड. तृणाल टोणपे यांनी कळविले आहे.
अरुण लातूरे, बसवराज शेटे, बसवराज गाबने, संजय लातूरे, सिद्रामप्पा अब्दूलपूरकर, अशोक भिंगारे तसेच इतर अनेक स्थानिक सोलापूरकर नागरिकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्यासह त्यांचे सहकारी वकील अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, अॅड. तृणाल टोणपे, अभिजित घुले-पाटील, रेश्मा गोखले अशी संपूर्ण कायदा-सहाय्यक टीम उपस्थित राहणार आहेत.
- हेही वाचा : पत्रकारांनो फालतू प्रश्न मला विचारू नका! : ना. अजित पवार
- सोलापुरात ‘एसआरपीएफ’ जवानाकडून गोळीबार, एकजण ठार
महानगर पालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न, स्वच्छता, पर्यावरण कायदा व नियम या गोष्टी लक्षात घेत,त्यानुसार नागरिकांचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न हाताळण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी योग्य संवाद झाला तर न्यायालयात जाण्याची गरज नसते या व्यापक अपेक्षेने पत्रकार परिषद असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.पत्रकार परिषदेसाठी जिल्हाधिकारी, सोलापूर महानरपालिका आयुक्त, विभागीय व जिल्हा प्रमुख प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही आमंत्रित करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी सुद्धा उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
———————————
पत्रकार परिषद –
स्थळ- तुळजापूर रोड, कचरा डेपो परिसर, सोलापूर.
वेळ- दुपारी १२.०० वाजता
तारीख- २६ ऑक्टोबर २०२१(मंगळवार)