सोलापूरच्या पोलिस आयुक्तांची बदली
दत्तात्रय कराळे नवे पोलिस आयुक्त
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोलापूरचे पोलिस आयुक्त म्हणून दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गृहविभागाने सोमवारी अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या राज्यात बदल्या केल्या आहेत. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाण्याहून डी .आर.कराळे सोलापूरला बदलून येत आहेत.
सांगली जिल्ह्यातील एरडोली तालुका मिरज येथील त्यांचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा झालं ते पूर्वी सेल टॅक्स ऑफिसर म्हणून काम करीत होते. त्यानंतर ते डी वाय एस पी झाले त्यांनी गडचिरोली जळगाव पुणे ठाणे तिथे सेवा बजावली यानंतर ते पदोन्नतीने सोलापूरचे आयुक्त म्हणून बदली झाली.