सोलापूरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची बदली
अहमदनगर येथे झाली बदली
सोलापूरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलिस अधिक्षक या पदावर बदली झाली आहे. बदलीचे आदेश गृह विभागाकडून गुरुवारी रात्री जारी करण्यात आले आहेत.
पोलिस अधिक्षक पाटील यांनी सोलापूर ग्रामीणमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यकालात जिल्ह्यात कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस व जनतेत सुसंवाद घडून येण्यासाठी त्यांनी त्यांनी सतत प्रयतेन केले.
त्यांची पोलिस अधिक्षक याच पदावर अहमदनगर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर येथे पोलिस अधिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.