आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

सोने म्हणून आपट्याचीच पाने का?

साडेतीन मुहूर्तापैकी एक सण दसरा आज

Spread the love

दसरा मेळाव्यात शहाजीबापूंची तोफ धडाडणार

 

थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा आज साजरा होत आहे. याच दसऱ्याला सोन लुटलं जातं. खरंच का आपटा दसऱ्याला तोडल्यानंतर त्याची पाने वाटतात ? आपण खरंच निसर्गप्रेमी आहोत का? याचा विचार देखील एकदा केला पाहिजे.

दसऱ्याचे सोनं म्हणून आपण आपट्याची पानं सर्रास तोडतो आणि या गावाला वाटत सुटतो.. खरं सोनं असतं तर असं वाटलं असतं?

परंतु मित्रांनो, आपट्याचे झाडाचे पान देखील सोन्या इतकच महत्त्वाच आहे.

आपट्याला शास्त्रीय भाषेत bahunia racemosa म्हणतात. ढीगभर फायदे आहेत या झाडाचे. खडकाळ मुरमाड टेकड्यांवर किंवा माळरानावर जर आपट्याचे झाडाचे रोपण केले तर इथं हे झाड खूप चांगलं वाढतं. माळरानावर येणारा एक आदर्श वृक्ष म्हणून आपटा गणला जातो.

आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासून तयार होत असत.

अश्‍मंतक याचा अर्थ “मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय. धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

हॉट व्हिडिओ बनविणे आले अंगलट लेडी कंडक्टरला केले निलंबित

*अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।*
पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा. आपट्याच्या पानाच्या मुळे गुरांच्या दुधात वाढ होते शिवाय आपट्यामुळे निसर्ग संवर्धनाची कार्य देखील खूप चांगले होते.


परंतु आपण करतो काय तर विजयादशमीच्या मुहूर्तावर फक्त कोल्हापूर सारख्या भागात जवळजवळ वीस ते पंचवीस टणांपेक्षा जास्त आपटा तुटला जातो आणि अगदी तीन चे चार तासात ही सर्व पाने जमिनीवर रस्त्यावर पसरलेली असतात.

म्हणजे त्यांचं महत्त्व संपते..?

जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला आपटा आपण मातीत मिसळतो…! हे आपलं दुर्दैव आहे.
आता आपट्याची झाड कालांतराने कमी होत आहेत, त्यामुळे आपट्यावरून आपण कांचन या वृक्षावर आलेलो आहे. काही दिवसानंतर कांचन जरी संपला तर कदाचित आपण वड, पिंपळ यांची पाने वाटण्यासाठी देखील मागे पुढे पाहणार नाही, अशी आपली गत झालेली आहे.

वास्तविक पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या वृक्षावर लपवली होती, असे इतिहासात उल्लेख आहेत. ते शमीचे झाड कसं आहे हे देखील बऱ्याच लोकांना माहीत नाही.

आपट्याची पाने तोडून न वाटता सरळ आपट्याचे झाडच सोनं म्हणून दिलं तर नक्कीच त्या झाडाचं संगोपन आणि संवर्धन होऊ शकेल.. आणि पर्यायाने आपण निसर्गाच्या बांधणीत हातभार लावू.
(स्त्रोत: इंटरनेट)

पाहा खास व्हिडिओ

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका