सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला नवे वळण
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोही करणार तपास
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील लवकरच तपास सुरू करणार आहेत. ते ड्रग अॅंगलवरुन या प्रकरणाचा तपास करणार आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी आज एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत. ईडीने NCB यांना पत्र लिहिले आहे. सुशांतशी संबंधित काही लोक ड्रग्स घेत होते. काही जणं ड्रग्स डिलरशीही संपर्कात होते. एनसीबी याचा तपास सुरू करीत आहेत.
राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार आमची नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची ऑपरेशनस टीम आणि बाकी दुसरी टीम या प्रकरणात ड्रग्स अॅंगलचा तपास करणार आहे. हा तपास मोठ्या स्तरावर करण्यात येणार असून ज्याबाबत दिल्ली-मुंबईतील मोठे आणि अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली जाईल.