सीना व भीमा नदीकाठी पूरस्थिती!
सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना

थिंक टँक / नाना हालंगडे
उजनी धरणात आज दुपारी 1.00 वाजता उपयुक्त पाणीसाठा 108.08% इतका झाला आहे. सद्यस्थितीत दौंड येथील भीमा नदीवरील सरीता मापन केंद्राच्या खालील बाजूस उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. उजनी धरणातून भीमा आणि सीना नदीमध्ये विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
सांगोला ब्रेकिंग, साडेतीन लाखांचा दारुसाठा जप्त
धरणाच्या उपयुक्त पाणी साठयामध्ये लवकरच मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये उजनी धरणाच्या सांडव्यावरून भिमा नदीमध्ये 50000 क्युसेक्सने विसर्ग चालू असून आज दुपारी 2.00 वाजता उजनी धरण सांडव्यावरून भिमा नदीमधील विसर्गामध्ये वाढ करून 60000 क्यूसेक्सने विसर्ग करणेत आलेला आहे.
जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत तुफान पावसाची शक्यता
त्यामुळे नदीतील एकूण विसर्ग सांडवा 60000 क्यूसेक्स व विद्युत गृह 1600 क्यूसेक्स असा एकूण 61600 क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणा-या पाण्याच्या आवक नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य हानी टाळणेसाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. तरी सिना व भिमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे.
ग्रामस्थांनो, तुमच्या गावात स्मशानभूमी नसेल तर प्रस्ताव पाठवा
तसेच मोठया प्रमाणात सोडलेल्या विसर्गांमुळे नदी, नाले, ओढे यावर असलेल्या पुलावरील गार्ड स्टोनवरून पाणी वहात असल्यास कोणत्याही नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
शहाजी पाटील हे शिंदे गटाचे “जॉनी लिव्हर”
पाहा खास व्हिडिओ