सांगोल्याचे शिल्पकार भाई गणपतराव देशमुख यांचा विधानभवन आवारात उभारणार पुतळा
हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांची मागणी मान्य
दुष्काळी सांगोला तालुक्यात विकासाची गंगा आणणारे शेकापचे नेते तथा भाई गणपतराव देशमुख यांचे नाव अजरामर राहणार आहे. त्यांचा पुतळा विधान भवन परिसरात उभारण्यात येणार आहे.
मुंबई : (नाना हालंगडे) विधानसभेत 11 वेळा निवडून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे विधानभवनाच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याला समर्थन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागणी मान्य केली. विद्यमान सदस्य चंद्रकांत जाधव, विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे, माजी आमदार गणपतराव देशमुख, माणिकराव जगताप, अनुपचंद शाह आदी 15 दिवंगतांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
या प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी 11 वेळा विधानसभेवर निवडून येणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे विधानभवन परिसरात स्मारक उभारावे, अशी सूचनावजा मागणी केली. अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याला पाठिंबा दिला. तशी विनंती विधानसभा तसेच विधान परिषदेच्या सभापतींना करण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.
राजकारणातील पितामह
भाई गणपतराव देशमुख यांचा जन्म १० ऑगस्ट १९२० रोजी झाला. त्यांनी १९५७ सालापासून सांगोला कोर्टात वकिलीला सुरुवात केली. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रथमच उमेदवारी मिळाली. १९६२ मध्ये शेकापकडून निवडणूक लढवून काँग्रेसच्या केशवराव राऊत यांचा दोन हजार ५७ मतांनी पराभव करून विधानसमेत प्रवेश केला. १९६७ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काकासाहेब साळखे यांचा ६७२ मतांनी पराभव केला. १९७२ मध्ये काँग्रेसचे काकासाहेब साळुंखे – पाटील व १९९५ अशा दोनवेळा शहाजी पाटील यांच्याकडून यांना पराभव पत्करावा लागला. त्यांनी तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना १९७२-७५ या काळात केली. १५ मे १९६९ मध्ये रस्ते वाहतूक मंडळाचे सांगोला सदस्य होते. १९८०-८२ साली महाराष्ट्र विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख, १९७८-८० मध्ये शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये कृषी, ग्रामीण विकास , विधी व न्याय खात्याचे मंत्री, १९९०-२००४ या काळात दोनवेळा विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून काम केले. १९९९ -२००२ मध्ये आघाडी सरकारमध्ये पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री, ३ ऑगस्ट २०१२ रोजी शेकापला ६५ वर्षे तर आबासाहेबांना विधिम पन्नास वर्षे पूर्ण झाली. २०१९ सालची विधानसभा निवडणूक न लढविता नातू शेकापकडून उमेदवारी अनिकेत यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. मात्र त्यात त्यांचा थोडक्या मताने पराभव झाला.
स्व. गणपतराव देशमुख हे महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून अकरावेळा निवडून आले. १६६२-६७ , १९६७-७२ , १९७४-७८ , १९७८-८० , १९८०-८५ , १९८५ – ९० , १ ९९० – ९५ , १९९९ -२००४ , २००४-०९ , २००९ -१४ , २०१४-१९
पुरस्कार • नवी दिल्ली : बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया • २००३ क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार • २००४ सार्वजनिक वाचनालय , नाशिकचा ‘ कार्यक्षम आमदार पुरस्कार २००७ – गांधी फोरम संघटना दिल्लीचा आदर्श समाजसेवक पुरस्कार ‘ • २ ९ जून २०० ९ तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ‘ जीवनगौरव पुरस्कार ‘ • २०१० : महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या , मुंबई यांच्या वतीने ‘ वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार ‘ • ३० मार्च २०१४ : ‘ रयत माउली सौ . लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार २६ एप्रिल २०१७ भारती विद्यापीठ , पुणे यांच्या वतीने ‘ जीवनसाधना गौरव पुरस्कार २ डिसेंबर २०१८ : अग्निपंख फाउंडेशनतर्फे ‘ डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार १३ नोव्हेंबर २०२० : किसन वीर सहकारी साखर कारखाना , सातारा यांच्या वतीने ‘ आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार ‘ परदेश प्रवास • १९७९ महाराष्ट्र शासनाच्या वतीने संयुक्त अरब अमिराती , कुवेत , सौदी अरेबिया व लिबीयाचा अभ्यास दौरा १२००८ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने चीन , हाँगकाँग , व्हिएतनामचा अभ्यास दौरा.