सांगोला हादरला, तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून
एखतपूर गावातील घटना
सांगोला/नाना हालंगडे
एका निर्घृण खुनाच्या घटनेने सांगोला तालुका हादरला आहे. अज्ञात कोणीतरी अज्ञात कारणावरून ३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्गुण खून केल्याची घटना शनिवारी पहाटे २ च्या सुमारास गस्तीवरील पोलीस अधिकारी यांच्या एखतपुर- आचकदाणी रोडवर उघडकीस आली. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संजय तुकाराम इंगोले (३४, रा. एखतपूर ( काखेची वस्ती ) ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी एखतपूर ते अचकदाणी रोडवर शनिवारी पहाटे २ च्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आचकदाणी रोड लगत एक तरुण मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता खूनाच्या संशयित सदर घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे आदी पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा