सांगोला भूमी अभिलेखमध्ये प्रॉपर्टी कार्डवर खाडाखोड केल्याची तक्रार
मोहसिन मुलाणी यांनी दिला तक्रारी अर्ज
सांगोला/विशेष प्रतिनिधी
भूमि अभिलेख कार्यालय सांगोला येथील सि.स.नं. 1975 चे क्षेत्र 48.20 चौरस मिटर अशी प्रॉपर्टी कार्डवरती नोंद असताना या मिळकतीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयामधून बेकायदेशीर प्रॉपर्टी कार्डावरती खाडाखोड करून सि.स.नं. 1975 प्रॉपर्टी कार्डाचे अनाधिकृतपणे खाडाखोड करून 48.20 चौरस मिटर असलेले क्षेत्राचे 78.20 चौरस मिटर क्षेत्र अशी नोंद केल्याची तक्रार उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे मोहसिन मुलाणी यांनी लेखी स्वरूपात दिली आहे.
मुलाणी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे की, सांगोला भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व बाहेरील दलाल यांच्याकडून शासनाची व नगरपालिकेची फसवणूक झालेली आहे.
या गंभीर प्रकाराची तात्काळ योग्य ती चौकशी होवून कार्यालयामधील या फसवणुकीसंबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.
भूमी अभिलेख प्रदेश कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगोला पोलिस स्टेशन यांनीही तक्रारी अर्जाच्या प्रती पाठविल्या आहेत.