गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

सांगोला तालुक्यात आभाळ फाटले; अनेक गावांचे रस्ते बंद

तरंगेवाडीत वीज पडून जर्सी ठार

Spread the love

परतीच्या या पावसाने पुरती दैना उडवली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळा-डिकसळ मार्गावरील पूल तुटला आहे. घेरडी गावाजवळच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा रस्ता बंद आहे. घेरडी-जवळा, घेरडी-पारे, डिकसळ-पारे रस्ताही बंद झाला आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात बुधवारी रात्रभर तुफान पाऊस कोसळला. जणू आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक गावांमध्ये पूल पाण्याखाली गेल्याने रस्ते बंद झाले आहेत. तरंगेवाडी येथे वीज पडून जर्सी ठार झाली आहे. परतीच्या या पावसाने पुरती दैना उडवली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जवळा-डिकसळ मार्गावरील पूल तुटला आहे. घेरडी गावाजवळच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा रस्ता बंद आहे. घेरडी-जवळा, घेरडी-पारे, डिकसळ-पारे रस्ताही बंद झाला आहे.

यंदाच्या दहाव्या चित्रा नक्षत्राने अक्षरशः दैना उडविली आहे. चित्रातील हा पाऊस नुकसानकारक ठरीत आहे. याचे वाहन उंदीर आहे. त्यामुळे 24 ऑक्टोंबर 2022 पर्यंत हा पाऊस अतिवृष्टीसारखाच असाच पडणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सद्या सांगोला तालुक्यात हा पाऊस नुकसानीचा ठरीत आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सांगोला तालुक्यात दशकानंतर अतिवृष्टी होत आहे. तीही नुकसानीची ठरीत आहे.

याच वर्षी पावसाची हमखास नक्षत्रे कोरडी गेली. पण परतीच्या या पाऊसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळित आहे. सलग आठ-आठ दिवस हा पाऊस तालुक्यात कोसळला आहे. अजूनही हा नुकसानीचा पाऊस सुरूच आहे.


खरिपातील पिकांच्या काढण्या अन् रब्बी पेरण्या केलेल्या ठिकाणी हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे. तसा हा परतीचाच पाऊस सध्या इतर पिकांसाठी नुकसानकारक आहे. यापूर्वी 2 ऑक्टोंबर 2010 रोजी ही तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी सहाजणांचे बळी गेले होते. आता तर याच पाऊसाने शेती संपूर्णपणे उद्धवस्त झाली आहे.

तरंगेवाडीत वीज कोसळली, जर्सी गाय ठार
सांगोला तालुक्यात परतीचा पाऊस सत्यानाश करणारा ठरीत आहे. घेरडी येथील घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास तरंगेवाडी येथे वीज कोसळून सव्वा लाखाची जर्सी गायी मृत्युमुखी पडली आहे. सांगोला तालुक्यात पाऊसाने हाहाकार माजविला आहे. सर्वच पाणीच पाणी पहावयास मिळत असून, या पाऊसाने मोठे नुकसान झाले आहे.घेरडीयेथे सहा दिवसापूर्वी वीज पडून तीन शेळ्या मेल्या असतानाच आज पुन्हा तरंगेवाडीत ज्ञानु महादेव गावडे यांची सव्वा लाखाची जर्सी गायी वीज पडून ठार झाली. तरंगेवाडी येथील कॅनॉल रोडला विठ्टल रुक्मिणी मंदिराजवळ गावडे यांचे घर आहे.


आज गुरुवार 20 ऑक्टोंबर रोजी पहाटे 3 वाजनेच्या सुमारास घराजवळ असलेल्या गायींच्या गोठ्यावर वीज कोसलल्याने ही गायी जागेवरच मृत पावली. ज्ञानू गावडे यांच्याकडे तीन जर्सी गायी, एक खीलार गायी अन् एक म्हैस आहे.गरीब कुटुंबियातील गावडे यांनी शेतीबरोबर दूध व्यवसाय म्हणून गायींचे पालन केले होते. अशातच हा पाऊस सत्यानाश करणारा ठरत आहे. याच पावसाने हाहाकार माजविल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. आजच्या या घटनेने गावडे यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.व्यायला झालेल्या या गायी मुळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याच वर्षी मृग,आर्द्रा, पुनवर्स,पुष्य,आश्लेषा,, मघा, पूर्वा, उत्तरा ही नक्षत्रे थोडाच पाऊस देवून गेली. पण 27 सप्टेंबर रोजी निघालेल्या हस्त नक्षत्रापासून या पाऊसाचा जोर पहावयास मिळालेला आहे. आता चित्राही विचित्र ठरीत आहे. याच दहाव्या नक्षत्राने सांगोला तालुक्यात दैना उडविली आहे. हे नक्षत्र सोमवार 10 ऑक्टोंबर 2022 रोजी निघाले आहे. याचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्राने आपला जोर कायम ठेवला आहे.

मागील दहा दिवसांपासून सांगोला तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.अनेकांची उभी पिके पाण्यातच आडवी झाली आहेत. ओडे,नाले,ताली,बंधारे,विहिरी, तलाव ओसांडून वाहू लागले आहेत.अनेकांच्या जमिनींना पाणीच लागले आहे. अक्षरशा पाझर लागले आहेत. याच पाऊसामुळे दीपावली सन ही करणे जिकिरीचे झाले आहे.त्यानंतर मात्र अकरावे नक्षत्र स्वाती हे सोमवार 24 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी निघणार आहे. सांगोला तालुक्यात हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे. शेत जमिनीची तर वाट लागलीच आहे,उलट तालुक्यातील रस्तांची ही दैना उडाली आहे.अचानक मुसळदार पाऊस पडीत असल्याने,याचा विपरीत परिणाम झालेला आहे.अख्खा पाऊसाला गेला पण परतीच्या याच पाऊसाने जनजीवन विस्कळित केले आहे.चित्राचा उंदीर सुसाट सुटला आहे.सांगोला तालुक्यात सर्वदूर हा पाऊस अजूनही कोसळत आहे.

याच परतीच्या पाऊसामुळे मोठे नुकसान झाले आहे.शेतीची पार वाटच लागली आहे.अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. एन दिवाळ सनात विपरीत घटना घडीत आहेत.चित्राचा पाऊस पडण्याची ही दशतकील घटना आहे.मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.दहाव्या महिन्यातील दहाव्या नक्षत्राचा हा पाऊस नुकसानीचा ठरीत आहे.याचा हा जोर 24 ऑक्टोंबर पर्यंत राहणार आहे.त्यानंतर 24 ऑक्टोंबर रोजी दुपारी स्वाती नक्षत्र निघणार आहे.आता तर फेब्रुवारी 2023 पर्यंत पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

काल बुधवार 19 ऑक्टोंबर रात्रीपासून ते आज गुरुवार 20 ऑक्टोंबर रोजी ही याच पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे.आजही पुन्हा पारे आणि घेरडी येथील पुल पाण्याखाली गेला आहे. दीपावली सुट्टीमुळे आज शाळेचा शेवटचा दिवस आहे.पण रस्तेच बंद असल्याने अनेक ठिकाणी शिक्षक अडकून पडले.

 

मल्लिकार्जुन खर्गेंमुळे आंबेडकरी चळवळीत उत्साह!

शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, “एकदम ओक्के” म्हणत कोल्हापूरकरांनी डिवचले!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका