सांगोला तालुक्यातील अवैध धंद्यांप्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक
पोलिस व तहसील प्रशासनाला दिले निवेदन
सांगोला : सांगोला तालुक्यातील अवैध धंद्यांप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्व अवैध धंदे बंद करावेत अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पोलिस व तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
सांगोला तालुक्यातील सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी सांगोला यांच्यावतीने करण्यात आलेली आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे चालू आहेत. त्यामध्ये जुगार मटका अवैद्य दारू विक्री या पद्धतीचे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.
अवैद्य धंद्याच्या माध्यमातून मिळवलेली संपत्ती सदरचे लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. वेठीस धरून ते लोकांना त्रास देत आहोत. त्यामुळे तालुक्यातील कायदा – सुव्यवस्था बिघडलेली आहे. त्यामुळे सदरचे अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुका अध्यक्ष विकास बनसोडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संबंधित प्रशासनाला तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेले आहे.
- हेही पाहा : 10 हजार भाविकांना विठ्ठल दर्शन
- जगभरातील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम ठप्प
- श्रीकांत देशमुख यांना पत्रकारांनी धरले धारेवर
- यंदा नवरात्रोत्सव फक्त आठ दिवसांचा
प्रशासनाने लवकरात लवकर अवैद्य धंदे बंद करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनामध्ये नमूद केलेले आहे. यावेळी सांगोला तालुका अध्यक्ष विकास बनसोडे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी होवाळ, तालुका महासचिव समाधान धांडोरे, सुनील काटे, पंकज काटे, विनायक गंगणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.