सांगोला तालुका खरेदी-विक्री संघावर पुन्हा शेकाचे वर्चस्व
३७ वर्षापासूनची सत्ता अबाधित, 2 जागा राष्ट्रवादी तर 1 बापू गटाकडे
सांगोला/ नाना हालंगडे
स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या, सातत्याने बिनविरोध परंपरा असलेल्या सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाची बिनविरोधची प्रक्रिया आताच पार पडली. यामध्ये 14 जागा शेकापकडे 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर एक जागा शिंदे गटाला देण्यात आली.
या निवडणुक प्रक्रियेत भाई चंद्रकांदादा देशमुख, शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख, दादाशेठ बाबर, इंजी.रमेश जाधव यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
या संघाची स्थापना 1955 सालाची असून,1985 सालापासून या खरेदी विक्री संघावर शेकापचे वर्चस्व अबाधित आहे. यामध्ये 2 महिला सदस्या आहेत. हीच बिनविरोधची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली.
पंचवार्षिक निवडणूकीच्या १७ जागेसाठी दाखल झालेल्या ६० अर्जापैकी ५६ अर्ज वैद्य ठरले तर ४ अर्ज अवैध (नामंजूर) झाले आहेत. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान घेण्यात येणार होते. आतापर्यंत या संघाची परंपरा आहे. कायम बिनविरोध निवड पार पडलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा संघ फायदेशीर आहे.
शेतकरी सूतगिरणीच्या निवडणुकीनंतर आता सांगोला तालुका खरेदी विक्री संघाच्या १७ जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली. ही निवडणूक ही बिनविरोध पार पडली.खरेदी-विक्री संघाचे व्यक्तिगत २१६४ सभासद असून ८३ संस्था सभासद असे एकूण २२४७ सभासद होते.
दरम्यान १७ जागेसाठी सोमवार, ९ ते १२ जानेवारी या कालावधीत १७ जागेसाठी सर्वसाधारण- १२ जागेसाठी- ३८ अर्ज, महिला प्रतिनिधी – २ जागेसाठी- ६अर्ज, इतर मागासवर्ग- १ जागेसाठी -६ अर्ज , भटक्या विशेष मागास प्रवर्ग-१ जागेसाठी -६ अर्ज, अनुसूचित जाती जमाती- १ जागेसाठी – ४ अर्ज असे एकूण ६० अर्ज दाखल झाले होते.
सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्थापनेपासून शेकापचे वर्चस्व आहे. यामध्ये काही जागा राष्ट्रवादीलाही दिल्या होत्या. पण आता तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचे आहेत. आता लागलेली निवडणूक शेकापसाठी प्रतिष्ठेची आहे. हा संघ राज्यातच अव्वल आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.
सांगोला सुतगिरणी निवडणूकी नंतर तालुक्यात, नव्हे तर राज्यात अव्वलस्थानी असलेल्या संघाचीही निवडणूक बिनविरोध झाल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.