सर्वपित्री अमावस्या आणि श्राद्धाचे महत्त्व
सांगोला/ एच.नाना
आज दिनांक ०६/१०/२०२१ रोज बुधवार भाद्रपद कृष्ण पक्ष सर्वपित्री अमावस्या आहे. अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस मानला जातो, भारतात बहुतांश भागात सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या सुद्धा म्हणतात. जी पित्रे पौर्णिमेच्या तिथीला, चतुर्दशीला तसेच अमावस्येला मरण पावले असतील अश्या तिन्ही तिथींचे श्राद्ध सर्वपित्रीला केले जाते. तसेच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या-त्या तिथींना करण्यास जमत नसेल तेव्हा मृतामांच्या शांतीसाठी सगळ्या पित्रांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात.
तसेच जर आपल्याला पित्रांच्या मृतूची तिथी माहिती नसेल अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध अमावस्येला करू शकतो आणि म्हणूनच या अमावस्येच्या तिथीला सर्व पित्री मोक्ष अमावस्या असे म्हणतात.
जे आत्मे पौर्णिमेच्या तिथीला अनंतात विलीन होतात अशा पित्रांचे श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेला न करता अमावसेला करतात कारण पितृ पक्षाची सुरुवात सहसा भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून होते.
पश्चिम बंगालमध्ये महालय अमावस्येला नवरात्र उत्सवाची सुरुवात मानल्या जाते. अशी आख्खायिका आहे की या दिवशी दुर्गा देवी पृथ्वी तलावर अवतरल्या होत्या. श्रीमद्भागवत गीतेच्या १० व्या अध्यायाच्या २९ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, ‘ पितरांमध्ये अर्यमा पितृ मी आहे !’ पितृ अर्यमाला सगळ्या पित्रांचा पितृ मानतात. जर केवळ अर्यमा पितृला संतुष्ट केले तर आपले सगळेच पितृ संतुष्ट होतात.
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्।।२९।।
या अमावस्येला सर्वपित्रा श्राद्ध केले जाते. या काळात निधन पावलेले पितर म्हणजे वडीलधारी मंडळी तसंच इतर मृत नातलग यमलोकातून आपल्या नातेवाइकांकडे येतात. या काळात ते आपल्या अवती भवती वास्तव्य करून राहातात. त्यामुळेच या काळात पुन्हा श्राद्धविधी केले जातात. या श्राद्धकर्मांमधून पितरांबद्दल आदर राखला जातो. यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते. मोक्ष मिळतो. तसंच ज्यांच्या मृत्यूदिनाविषयी निश्चित माहिती नसते,त्यांचंही श्राद्ध या दिवसांमध्ये केलं जातं.
श्रीकांत देशमुख यांना पत्रकारांनी धरले धारेवर
यावेळी केलं जाणारं पिंडदान हे देखील याच कारणास्तव केलं जात असतं. काही वेळा आपल्या मृत पितरांना स्वर्ग मिळाला नसतो. त्यांना दुसरा जन्मही मिळाला नसतो. असे आत्मे पितृलोकात किंवा आपल्याच आवती भवती भटकत राहातात. त्यांच्या क्षुधाशांतीसाठी पिंडदान करण्याची पद्धत आहे. मात्र लहान वयात मृत्यू झालेली बालकं किंवा संन्यास धारण केलेले पितर यांना पिंडदान केलं जात नाही. सर्व पितृमोक्ष अमावस्येला आपल्या घराण्यातील सर्व मृत पूर्वजांचं श्राद्ध केलं जातं.
१) ज्यांना वडिल नाही अशांनी आपल्या वडिलांसाठी प्रत्येक अमावस्याला उपवास करावा आणि मानव रोज जेवन करतो पण मानवाचे एक वर्ष म्हणजे पित्राचा एक दिवस असतो म्हणुन पित्र वर्षीक आणि महालय असे दोन वेळा पित्र जेवन करतात
२) ज्यांचे या महालयमध्ये श्राद्धमध्ये (विहीत) काही करणामुळे राहिले असेल अशांनी दि १५/११/२०२१ रोजी बुधवारी वृश्चिक राशी सु्र्य प्रवेश करत आहे या दिवशी महालय समाप्ति आहे या दिवसापर्यंत महालय श्राद्ध करू शकतात. अमावस्या मंगळवारी रात्री ७ वाजून ४ मिनिटांनी आलेली आहे. बुधवार सायंकाळी ४ वाजून ३५. मिनिटा पर्यंत आहे.