शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सायकलींचे वाटप
बुरंगेवाडीत १५ व्या वित्त आयोगातून झाला कार्यक्रम
सांगोला/ नाना हालंगडे
तालुक्यातील बुरंगेवाडी येथे १५ व्या वित्त आयोगातून १० मुलींना सायकलींचे वाटप व शाळेच्या संरक्षण भिंतीच्या पायभरणीचा कार्यक्रम शेकापचे युवक नेते डॉ. बाबासाहेब देशमुख व सरपंच रजाक्का बुरंगे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
बुरंगेवाडी ग्रामपंचायतीवर गेली कित्येक वर्षापासून शेकापची सत्ता असून, गावाचा चौफर विकास केलेला आहे. अशातच ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून १० सायकली व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी देण्यात आला. तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बुरंगे व गिरजाप्पा बुरंगे यांनीही तीन सायकली यावेळी दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, ग्रामपंचायत हे देवालय आहे. सर्वांनी यामध्ये सामावून कामे केली तर विकास व्हायला वेळ लागत नाही. सर्व योजना तळागाळातील गोर गरीबांना देवून विकास साधा,आजचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. शाळेतील मुलांनाही योजना द्या, असेही देशमुख यांनी सांगितले.
यावेळी ग्रामसेविका सोनलकर मॅडम यांनी ग्रामपंचायत कार्याचा आढावा सांगून मुलांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवून आपले व आपल्या कुटुंबाचे नाव उज्जल करावे असेही आवाहन यांनी केले.
यावेळी अर्जुन बुरंगे, राजू गावडे, मायाप्पा यमगर, आनंदराव यमगर, शरद खताळ, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.