ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

शिवराज राक्षे बनला महाराष्ट्र केसरी

सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला केले चितपट

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली. विशेष म्हणजे दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत.

यातील चितपट झालेला महेंद्र गायकवाड हा शिरशी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील मूळचा आहे.

वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत . ज्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी गदा देण्यात आली.

महाराष्ट्र केसरी २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती . यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत झाली . ही अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली . सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला .

दरम्यान , अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते . पण अखेर ६-४ अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत फायनलमध्ये धडक दिली . दुसरीकडे मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर च्यात पार पडली .

ही लढत फारच एकतर्फी झाल्याचं दिसून आलं शिवराजनं सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवलं आणि अखेर ८-१ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत फायनल गाठली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका