शहाजी पाटील हे शिंदे गटाचे “जॉनी लिव्हर”
आ. अमोल मिटकरी यांनी उडविली खिल्ली
थिंक टँक / नाना हालंगडे
सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शहाजीबापू पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही”, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकरी (amol mitkari) यांनी उडविली आहे. शहाजी बापू पाटील यांनी आमदार मिटकरी यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मिटकरी हे अकाेला येथे बाेलत हाेते.
आमदार शहाजी पाटील यांनी “अमोल मिटकरी यांचा संजय राऊत (sanjay raut) होणार” असं वक्तव्य नुकतेच केले हाेते. अमोल मिटकरींनी आमदार शहाजी पाटलांच्या वक्तव्यास प्रत्युत्तर देत ते सध्याच्या सरकारममधील करमणुकीचं पात्र आहे असे म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकरी म्हणाले की, शिंदे गटाचे ते जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. ‘माझी’ काळजी न घेता, शिंदे गटात त्यांची कशी पायखेचनी सुरु आहे. याची काळजी घ्यावी” असंही मिटकरींनी नमूद केले.
मिटकरी म्हणाले “शिंदे गटात कितीही डायलॉग बाजी केली तर तुम्हांला कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री हे पद देखील भेटणार नाही. त्यांची ही शेवटीचं टर्म राहील” असेही मिटकरींनी नमूद केले.
गणपती स्थापनेवरूनही मिटकरींनी आज राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. अनेक लोक अमोल मिटकरी यांना नास्तिक म्हणतात या संदर्भात बोलले आहेत. काही लोक आजही दीड दिवसाचा गणपती बसवतात, मात्र मी पूर्णपणे दहा दिवसाचा गणपती बसवतोय असा टाेला मिटकरींनी आमदार ठाकरेंना लगावला.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धुक्याची झालर
मिटकरींच्या निवासस्थानी बाप्पाचे जल्लोषात आगमन
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले. मिटकरी यांच्यासह पत्नी कविता तसेच संपूर्ण कुटूंबाने गणरायाची पूजा अर्चा केली. शेतकऱ्यांवरील संकट जाऊ दे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळु दे अशी प्रार्थना यावेळी मिटकरी कुटुंबियांनी गणरायास केली.