शहाजी गडहिरे यांना उडान फाऊंडेशनकडून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान
सांगोल्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सत्कार
सांगोला : थिंक टँक न्यूज नेटवर्क
उडान फाऊंडेशन कोल्हापूरच्या वतीने अस्तित्व या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नुकताच मिळाला. त्यानिमित्त सांगोला तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
गेल्या 25 वर्षापासून सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यात विशेषता सांगोला, मंगळवेढा तालुक्यात दलित,अल्पभूधारक, भटक़े विमुक्त, एकल महिला यांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले आहेत. दुष्काळ निर्मूलन, पर्यावरण संतुलन यासाठी डोह मॉडेल, वृक्ष लागवड,विहीर पूणर्भरण, कोरडवाहू फळबाग लागवड, सेंद्रिय शेती,परसबाग लागवड असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी धान्यबँक, मुलींसाठी सायकल बँक असें अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सांगोला, मंगळवेढा व सोलापूर शहरातील 700 पेक्षा जास्त महिलांना उद्योजकता विकासा साठी प्रशिक्षण दिले आहे. त्यातील 400 महिला आज छोटे छोटे उद्योग करीत आहेत.
गेल्या जवळ जवळ दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या काळात गरिबांचे रोजगार बंद होते.जगण्यासाठी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते या काळात सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील दलित,भटकेविमुक्त, अल्पभूधारक, भूमिहीन,एकल महिला, सोलापूर श हरातील विडी कामगार अशा 4900 दुर्लक्षित कुटुंबाना तसेच सांगली जवळच्या पूरग्रस्त कुटुंबाना तात्काळ मदत केली आहे.
सांगोला तालुक्यामध्ये एप्रिल-मे महिन्यात कोविड 19 रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. तालुक्यात कडक टाळेबंदी केली होती. कडक टाळेबंदीमुळे दवाखान्यातील रुग्ण त्यांचे नातेबाईक तसेच सांगोला शहरातील निराधार लोक, रस्त्यावर रहाणारे लोक यांची उपासमार होउ नये म्हणुन त्यांच्यासाठी 22 मे ते 2 जुलै या काळात सांगोला एस.टी.बस स्टँडवर 40 दिवस कम्युनिटी किचन सुरु करून 3250 लोकांना मोफत जेवण ऊपलब्ध करून दिले.
वरील प्रकारची अनेक कामे केली असून या कामामुळे अनेक पुरस्कार मिळालेे. नुकताच कोल्हापूर येथील उडान फाऊंडेशन कडून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे.