शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, “एकदम ओक्के” म्हणत कोल्हापूरकरांनी डिवचले!
हातकणंगले : थिंक टँक न्यूज नेटवर्क
“काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील..” फेम सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगली – कोल्हापूर रस्त्यावर ट्रॅफिक जामचा चांगलाच सामना करावा लागला. सुमारे तासभर त्यांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली. शहाजीबापूंना पाहून ट्रॅफिक जाममधील वाहन चालक जाम खुश झाले. तिथेच “काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील..” चा आवाज घुमला.
आमदार शहाजीबापू पाटील हे कोल्हापूर-सांगली मार्गावर हातकणंगलेजवळ चक्क वाहतूक कोंडीत अडकले. यावेळी आमदार शहाजीबापू दिसताच वाहनधारकांनी त्यांना उद्देशून काय तो सांगली- कोल्हापूर रस्ता, काय ते खड्डे, आणि काय ते ट्रॅफिक एकदम ओक्के असे म्हणत संताप व्यक्त केला.
खड्ड्यात वाहने अडकली
कोल्हापूर -सांगली मार्गावरील खडयेमय रस्त्याच्या वाहतूक कोंडीत हातकणंगले जवळ आमदार शहाजीबापू पाटील अडकले. अर्धा तास त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला.
गाडीतच घेतली डुलकी
आमदार पाटील यांच्या गाड्यांचा ताफा पुढे सरकत नसल्याने त्यांनी गाडीतच डुलकी घेतली. यावेळी वाहनधारकानी त्यांना उद्देशून काय तो सांगली- कोल्हापूर रस्ता, काय ते खड्डे, आणि काय ते ट्रॅफिक एकदम ओक्के असा संताप व्यक्त केला.
कोल्हापूर-सांगली दुरवस्था
कोल्हापूर-सांगली राज्य मार्ग आहे की शेतीचा पाणंद रस्ता अशी स्थिती या मार्गाची झाली आहे. शिंदे गटाचे आ. शहाजी बापू पाटील हे सांगलीकडून कोल्हापूरकडे येत असताना हातकणंगले बसस्टँड जवळ पडलेल्या रस्त्यावरील खडयामध्ये जाम झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकले. शहाजीबापू यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकल्याने हातकणंगले परिसरातील वाहनधारक आणि नागरिकानी त्यांच्यासमोर एकच गर्दी केली. त्यांच्या सुरक्षा रक्षकाला ट्रफीक मधून मार्ग काढत त्यांना पुढे वाट करून दयायची वेळ आली. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
राजू शेट्टींच्या गर्दीचा फटका
दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेमुळे या रस्त्यावर मोठी गर्दी उसळली होती. त्याचाही आमदार पाटील यांना फटका बसला. त्यात रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहतूक प्रचंड खोळंबली होती.
मुख्यमंत्र्यांचा गोंधळ! चुकून यशवंत मनोहरांना वाहिली श्रद्धांजली