शशिकला बाबर ठरल्या सोन्याच्या नथीच्या मानकरी
घेरडीत महिलांचा बंपर कार्यक्रम संपन्न

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे स्व. आमदार गणपतराव देशमुख विचारमंच व घेरडी पंचायत समिती गण महिला आघाडीच्यावतीने महिलांसाठी हळदी कुंकू व भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात डिकसळच्या सरपंच, आदर्श शिक्षिका शशिकला मधुकर बाबर यांनी प्रथम क्रमांक पटकावित सोन्याची नथ मिळविली. यासह अन्यही 19 महिलांना हे बक्षीस आणि अन्य बक्षिसे देण्यात आली.
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे पंचायत समिती गण महिला आघाडीच्यावतीने महिलांसाठी व भव्य सर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख (आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला), श्रीमती कल्पनाताई शिंगाडे (व्हा.चेअरमन महिला सूतगिरणी सांगोला), सौ. राणीताई माने (माजी नगराध्यक्षा सांगोला), सौ.स्वातीताई मगर (माजी उपनगराध्यक्षा, सांगोला), सौ.छायाताई मेटकरी (नगरसेविका सांगोला), सौ.उज्वलाताई गिरीष नश्टे(माजी संचालिका महिला सूतगिरणी सांगोला) यांच्या हस्ते करण्यात आले.
शशिकला बाबर या डिकसळ येथील आश्रम शालेय हिन्दी विषयाच्या शिक्षिका असून गावच्या पाच वर्षे शिक्षिका होत्या. यांनी गावाचा चौफेर विकास तर केलाच,पण गावाला नावलोकीकही मिळवून दिला. महिलावर्गांच्या उन्नतीसाठीही त्यांनी चांगलेच कार्य केले. त्या सतत महिलांच्या विविध प्रश्नासाठी अग्रेसर असतात.
याच वेळी बोलताना निकिताताई देशमुख म्हणाल्या की, महिला वर्गासाठी हळदी-कुंकू हा कार्यक्रम पर्वणीच असतो. यातूनच सुख दुःख,आणि विविध प्रश्नांची सोडवणूक होते. एक प्रकारे नवसंजीवनी निर्माण होते. असे कार्यक्रम सतत घ्यावेत. घेरडीच्या सरपंच सुरेखाताई यांचे कार्य महान आहे. अशाच प्रकारे महिलांनी एकत्र येत सतत विविध कार्यक्रम घेतले पाहिजेत.
याच स्पर्धेसाठी 1 हजार 20 इतकी कुपने होती याचे नेटके नियोजन सोमा मोटे, प्रा.डॉ.किसन माने, पिंटू पुकले यांनी केले होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून सांगोला पंचायत समितीच्या माजी सभापती मायाक्काताई यमगर, आगलावेवाडीच्या माजी ग्रा.पं. सदस्या सुमनताई यमगर, वैशाली राजेंद्र गावडे, स्मिताताई कांबळे, बुरंगेवाडी सरपंच राजाक्का अर्जुन बुरंग, भापसेवाडी सरपंच रंजना श्रीपती वगरे, तरंगेवाडी सरपंच उज्वला अनिल गावडे, आगलावेवाडीच्या सरपंच शांताबाई हरिश्चंद्र हाके आदीसह दीड हजार महिला व युवती उपस्थित होत्या.
यांच्यासह घेरडी पंचायत समिती गणातील घेरडी, डिकसळ, हंगरगे, नराळे, पारे, हबिसेवाडी, गावडेवाडी आदी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्या, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होत्या.
या स्पर्धेसाठी सोन्याच्या नथीची २० बक्षिसे व स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला वर्गासाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
आगामी निवडणुकीची नांदी
घेरडीत झालेला महिलांचा मेळावा हा आगामी होणाऱ्या निवडणुकीचा माहोलच पहावयास मिळाला. प्रा.डॉ.किसन माने, आबा मोटे, पिंटू पुकळे, सरपंच सुरेखा पुकळे यांनी नेटके नियोजन केले होते. दीड ते दोन हजार महिलांची उपस्थिती पहावयास मिळाली.
विजेते लकी ड्रॉ
शशिकला बाबर
विरा संतोष चव्हाण
दिपाली चंद्रकांत खुळपे
जिजाबाई उत्तम बुरुंगे
कल्पना सिद्राम जाधव
सुनिता संभाजी बिचुकले
बाळाबाई तातोबा देवकते
रिहाना सुरेश सूर्यवंशी
सुवर्णा तुकाराम माने
रंजना श्रीपती वगरे
सरस्वती माने
भामा विठ्ठल हातेकर
सविता परमेश्वर डोंबाळे
प्रतीक्षा विशाल जगधने
नीलम पोपट कुंभार
मायाक्का आबा बिचुकले
मनीषा कुंभार
तायडा भोजलिंग घुटूकडे
रुपाबाई सुबराव यमगर
पैठणीच्या ह्या मानकरी
याच कार्यक्रमात रोहिणी भोसले (प्रथम क्रमांक), चैत्राली नायकुडे (व्दितीय क्रमांक) तर मनीषा चंदनशिवे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
हेही वाचा