विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ
350 विद्यार्थ्यांच्या सृजनरंगांची बरसात; तयारी पूर्ण
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन 2020-21 च्या सतराव्या युवा महोत्सवास सोमवार, दि. 6 सप्टेंबर 2021 पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. कोविडमुळे ऑनलाईन पद्धतीने रंगणाऱ्या या तीन दिवसीय युवा महोत्सवात 40 महाविद्यालयातील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून एकूण 16 कलाप्रकारांचे सादरीकरण यात होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
सोमवार, दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता ऑनलाइन पद्धतीने महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने कलाप्रकारांच्या सादरीकरणाला सुरुवात होणार आहे. नृत्य, ललित, गायन आणि वांग्मय अशा चार विभागात कलाप्रकारांची वर्गवारी करण्यात आली आहे, त्यानुसार कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यार्थी आपल्या घरी राहूनच दिलेल्या लिंकवर विहित वेळेत आपल्या कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत.
सोमवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मराठी वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, स्थळचित्रण या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. दुपारी दोन वाजता शास्त्रीय सुरवाद्य आणि भित्तीचित्रण या स्पर्धांना सुरुवात होईल. मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुगम गायन, व्यंगचित्रण, हिंदी वक्तृत्व तर दुपारी दोन वाजता इंग्रजी वक्तृत्व आणि शास्त्रीय तालवाद्य स्पर्धा रंगणार आहेत. बुधवारी, 8 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाद-विवाद, कातरकाम आणि दुपारी रांगोळीच्या स्पर्धा होतील, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांनी दिली.
हेही वाचा : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेगाभरती
सोलापूरात मोफत पेट्रोल भरण्यासाठी उडाली झुंबड
जगाला हेवा वाटेल असे अहिल्यादेवींचे स्मारक सोलापूरात साकारणार
सोलापूर महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांची कृषीपंप थकबाकी माफ
‘वंचित’ला सोलापूरात खिंडार, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीत जाणार
वांग्मय विभागाचे नियोजन देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी कॉलेज यांच्याकडून, नृत्य विभागाचे नियोजन वसुंधरा कला महाविद्यालय, गायन विभागाचे नियोजन विद्यापीठ कॅम्पसमधील ललित कला व कला संकुलाडून तर ललित विभागाचे नियोजन संगमेश्वर महाविद्यालयाकडून होणार आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्र पर्यवेक्षक आणि तंत्र सहाय्यकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. कोरे यांनी दिली.