विकासकामांचा डोंगर रचणारी नवदुर्गा

जवळा जि. प. गटाच्या सदस्या स्वातीताई कांबळेंची यशोगाथा

Spread the love

आजचा रंग : निळा – नवरात्रौत्सवात निळ्या रंगाला महत्त्व आहे. नवरात्रौत्सवात सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे, असे मानले जाते.

सांगोला : डॉ. नाना हालंगडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माझी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते घडले. त्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीयाही आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे श्रीमती स्वातीताई कांबळे.

स्वातीताई कांबळे या सदस्या जिल्हा परिषद सोलापूर जवळा गट, सदस्या शिक्षण समिती जिल्हा परिषद सोलापूर, सदस्या आरोग्य समिती जिल्हा परिषद सोलापूर, सदस्या जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद सोलापूर, सिनेट सदस्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, प्रवक्ता महिला राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा, सल्लागार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य अशा विविध पदांवर काम करीत आहेत.

स्वातीताई कांबळे यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी असाच आहे. ही नवदुर्गा, रणरागिणी थोर अशी समाजसेविका आहे. त्यांचे बंधू गणेश कांबळे यांच्या समाजसेवेची अजोड जोड त्यांना लाभलेली आहे. त्या वाकी-घेरडी गावच्या कन्या आहेत व कडलासच्या सुनबाई आहेत. त्यांचे वडील, सासरे, भाऊ दीर्घकाळापासून राजकारणात सक्रीय आहेत. घरातील बुजूर्ग मंडळींचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी वाकी-घेरडीसह जवळा जि.प. गटात समाजकार्य करण्याची सुरुवात केली. मा. आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी जि.प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. स्वातीताई कांबळे यांचे कार्य अचंबित करण्यासारखेच आहे. त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व त्यात त्या विजयी झाल्या.

जवळा जि.प. गटाच्या विकासाबरोबरच सांगोला तालुक्यातही मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवून त्यांनी आपली वेगळी ओळख करुन दिली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती, वॉलकंपाऊंड, पाणी पुरवठा, अंगणवाडी दुरुस्ती व नवीन इमारत बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारत बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र दुरुस्ती व बांधकाम, दलित वस्ती सुधार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, 3054, 5054 अंतर्गत डांबरीकरण रस्ते, तिर्थक्षेत्र, जनसुविधा, नागरी सुविधा, नालाखोलीकरण- रुंदीकरण, नवीन बंधारे, कोविड 19 मध्ये जिल्ह्यात भरीव निधीसाठी योगदान, वृक्षलागवड, महिला बचत गटांना प्रोत्साहन, कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेली निधी मागणी याबाबत सक्रिय पाठपुरावा, वाकी-घेरडी येथे नवीन मिनी अंगणवाडी अनेक वर्षापासून प्रलंबीत होती. त्याचा पाठपुरावा करुन त्यास मान्यता, तालुक्यातील अनेक नॉन प्लॅन रस्ते प्लॅनमध्ये समावेश करुन घेतले.

पक्ष, पार्टी असा कोणताही भेदभाव न मानता स्वातीताईंचे बंधू गणेश कांबळे हे गेली २० वर्षापासून समाजसेवा करीत आहेत. अशात स्वातीताई जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या समाजसेवेला रंग, रूप आला. जवळा जिल्हा परिषद गटाबरोबरच तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवून स्वातीताईनी आपल्या पदाचा चांगला उपयोग केला. बंधूचे बाळकडू येथे उपयोगी पडले.

तालुक्यातील काही देवस्थानात तिर्थ क्षेत्र “क” दर्जात समावेश केला. अंगणवाडी सेविका, मदतनिस, प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्या अनेक मागण्याबाबत सक्रीय पाठपुरावा केला. अनेक केंद्र व राज्य सरकारकडील सर्व योजनांचा सक्रीय पाठपुरावा करुन अनेक वैयक्तिक लाभ मिळवून दिले.

जिल्हा परिषदेच्या सर्व सभा, कार्यक्रमांना 100% उपस्थितीत राहून अनेक प्रलंबीत प्रश्न निकाली काढले. स्मार्ट अंगणवाडी साठी योगदान, हंगामी कर्मचारी कायम करण्यासाठी योगदान. अशा ग्रामपंचायतीसह विविध विभागात त्या अव्वलस्थानी राहिल्या.

जवळा जिल्हा परिषद गटाबरोबरच तालुक्यामध्ये स्वातीताई यांनी ६० कोटी रुपयांची विकासकामे केली आहे. हैद्राबाद, दिल्ली व गुजरात राज्याचा त्यांनी अभ्यासदौराही त्यांनी केलेला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका